शहरं
Join us  
Trending Stories
1
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
2
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
6
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
7
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
8
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
9
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
10
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
11
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
12
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
13
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
14
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
15
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
16
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
17
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
18
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
19
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
20
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
Daily Top 2Weekly Top 5

१८१ हेक्टर वनाची राख

By admin | Updated: April 22, 2016 03:35 IST

हवा, पाणी, जंगल व पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने आज मानवाला ग्लोबल वार्मिंगचा फटका

नरेश रहिले ल्ल गोंदियाहवा, पाणी, जंगल व पृथ्वीवरच्या नैसर्गिक साधन संपत्तीचा अविचारी वापर केल्याने आज मानवाला ग्लोबल वार्मिंगचा फटका सहन करावा लागत आहे. वातावरण निर्मितीमुळे अकाली पाऊस किंवा अवर्षनाची स्थिती निर्माण झाली आहे. होणाऱ्या वृक्षांच्या कत्तलीमुळे व जंगलांना लागणाऱ्या आगिमुळे परिस्थिती बदलत आहे. एकीकडे वसुंधरा बचावाचा संदेश दिला जात आहे तर दुसरीकडे त्याच वसुंधरेचा विनाश करण्यासाठी मनुष्य मागेपुढे पाहत नाही. याचा प्रत्यय दिसून येत आहे. गोंदिया जिल्ह्यात यावर्षी १८१.३५ हेक्टर वनजमिनीला आग लागली आहे. त्यामुळे वनांचा ऱ्हास होत आहे. गोंदिया जिल्हा वनांनी नटलेला असून गोंदिया जिल्ह्यातील वनजमिनीच्या ४३ टक्के जमिनीवर वन आहे. त्यामुळे गोंदिया जिल्हा वनांनी नटलेला दिसत असला तरी गोंदिया जिल्ह्यात आगीच्या घटना मागच्यावर्षीच्या तुलनेत यावर्षी वाढलेल्या आहेत. सडक अर्जुनी वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात १६.७५ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. नवेगावबांध वनपरिक्षेत्रात आगीच्या १८ घटना घडल्या असून त्यात ४०.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोठणगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात २५.१० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोरेगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात १३ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. सालेकसा वनपरिक्षेत्रात आगीच्या ४ घटना घडल्या असून त्यात ३० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. आमगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात ८ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोंदिया वनपरिक्षेत्रात आगीच्या दोन घटना घडल्या असून त्यात २ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्रात आगीच्या आठ घटना घडल्या असून त्यात१३.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. उत्तर देवरी वनपरिक्षेत्रात आगीच्या सहा घटना घडल्या असून त्यात ८.५० हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. चिचगड वनपरिक्षेत्रात आगीच्या ५ घटना घडल्या असून त्यात २४ हेक्टर वनपरिसरात आग लागली आहे. गोंदिया जिल्ह्यातील ५०० एकर जंगलात आग लागली. मात्र या आगित नुकसान किती झाले याची आकडेवारी वनविभागाने लपवून ठेवली आहे. ब्लोअरमुळे आग नियंत्रणात ४वनातील आगीवर वेळीच नियंत्रण आणण्यासाठी यावर्षी १८० ब्लोअर घेण्यात आले आहे. जुने ५० ब्लोअर असे मिळून २३० ब्लोअर वनविभागाकडे आहे. लागलेल्या आगींवर वेळीच नियंत्रण मिळविण्यासाठी वनविभागाने या ब्लोअरचा वापर केल्याचे सांगितले गेले. फायर लाईनवर खर्च केले ५० लाख४वनांना आग लागू नये यासाठी वनविभागाने फायरलाईन तयार करण्यासाठी सतत तीन महिने गावातील मजुरांना काम देवून त्यांच्याकडून फायरलाईनचे काम करण्यात आले. ५० लाख रुपये जिल्ह्यात फायरलाईनसाठी देण्यात आले. या फायरलाईनच्या कामात भ्रष्टाचार होतो असा कांगावा दरवर्षी राहत असल्याने यावर्षी फायरलाईनचे काम करण्याची जबाबदारी संयुक्त वनव्यवस्थापन समितीला देण्यात आली होती.