शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

७७८ विद्यार्थ्यांसाठी नगर पालिकेच्या १८ शाळा

By admin | Updated: July 28, 2014 23:35 IST

नगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११९ ने कमी झाली आहे.

दैना न.प.च्या शाळांची : दरवर्षी सुरू आहे पटसंख्या गळतीकपिल केकत - गोंदियानगर पालिकेच्या शाळांना जडलेला विद्यार्थी पटसंख्या गळतीचा रोग अद्यापही नियंत्रणात आलेला नाही. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीही पालिकेच्या शाळांतील विद्यार्थी पटसंख्या ११९ ने कमी झाली आहे. हे चक्र असेच सुरू राहिले तर काही वर्षातच नगर परिषदेवर आपल्या सर्व शाळा बंद करण्याची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही.नवीन शैक्षणिक सत्रात पालिकेच्या प्राथमिक शाळांत (वर्ग १ ते ७) फक्त ७७८ विद्यार्थ्यांची नोंद आहे. असे असतानाही या नाममात्र विद्यार्थ्यांसाठी पालिकेच्या १८ शाळा सुरू आहेत. खाजगी शाळांमध्ये हजारो विद्यार्थी असून पालिकेच्या शाळांमध्ये मात्र बोटावर मोजण्याएवढेच विद्यार्थी असल्याने या शाळांचे अस्तित्व धोक्यात आले आहे.आजघडीला शहरातील खाजगी शाळा पालिकेच्या शाळांवर वरचढ झाल्या आहेत. यात निकाल म्हणा की पटसंख्या दोन्ही बाबतीत पालिकेच्या शाळा माघारलेल्या आहेत. खाजगी शाळांमध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्याची वेळ येत असताना मात्र पालिकेच्या शाळात आता शिक्षकांना विद्यार्थ्यांसाठी घरोघरी जाण्याची पाळी आली आहे. एकतर पालिकेच्या शाळांचा घसरत चाललेला दर्जा, त्यात निकालांत पालिकेची एकही शाळा १०० टक्के निकाल देत नसल्याने पालकांचाही कल आता खाजगी शाळांकडे वाढत चालल्याचे दिसून येत आहे. हेच कारण आहे की, कधी विद्यार्थ्यांनी खचाखच भरणाऱ्या पालिकेच्या शाळा आता ओस पडत आहेत. मागील कित्येक वर्षांपासून पालिकेच्या शाळांना पटसंख्या गळतीचा हा रोग जडला आहे. मात्र यावर तोडगा काढण्यात पालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे. मागील वर्षी सन २०१३-१४ या शैक्षणिक सत्रात पालिकेच्या १८ प्राथमिक शाळांमध्ये ८९७ विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवीत होते. सन २०१४-१५ या शैक्षणिक सत्रात गळतीची ही साथ सुरूच असून पटसंख्या ७७८ वर आली आहे. म्हणजेच या वर्षी पालिके ने ११९ विद्यार्थी गमावले आहेत. या विद्यार्थ्यांनी एखाद्या खाजगी शाळेची वाट धरली असेल यात शंका नाही. दिवसेंदिवस घटत चाललेली ही विद्यार्थी संख्या पालिकेसाठी गंभीर विषय आहे. मात्र पालिका प्रशासन याबाबतीत अद्यापही गंभीर नसल्याने गळतीचा हा प्रकार थांबण्याचे काही नाव घेत नसल्याचे दिसते. या शैक्षणिक सत्रातही पालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची आकडेवारी बघावयाची झाल्यास फक्त ७, ८, १२, १६ एवढे विद्यार्थी आहेत. बोटावर मोजण्याएवढी विद्यार्थी संख्या असतानाही शिक्षणाचा दर्जा मात्र खालावलेलाच असल्याचे दिसून येत आहे. यामुळेच पालक आपल्या पाल्यांचे भविष्य धोक्यात न घालता त्यांना रक्कम मोजून खाजगी शाळांमध्ये टाकत असल्याचे दिसून येत आहे.