शहरं
Join us  
Trending Stories
1
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
2
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
3
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
4
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
5
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
6
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
7
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
8
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
9
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
10
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
11
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
12
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
13
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
14
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
15
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
16
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
17
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
18
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
19
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत

By admin | Updated: May 27, 2015 01:02 IST

शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे बाध्य असलेल्या शाळांवरून वाद सुरू आहे. जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे.

गोंदिया : शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे बाध्य असलेल्या शाळांवरून वाद सुरू आहे. जिल्ह्यातील १६ शाळा अनधिकृत असल्याची माहिती शिक्षण विभागाने दिली आहे. या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. सरकारची कसलीही परवनागी न घेता या शाळा सुरू करण्यात आल्या. शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनुसार अनधिकृत शाळांविरूध्द कारवाई करण्याच्या संदर्भात कारवाई करण्याचे शालेय शिक्षण व क्रिडा विभागाने जाहीर केले. अश्या शाळांविरोधात दंडात्मक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहे.शिक्षण हक्क कायद्यानुसार सरकारची अथवा स्थानिक प्राधीकरणाच्या मान्यात किंवा नाहरकत प्रमाणपत्राशिवाय शाळा चालविण्यात येत असेल तर संबधितांना एक लाख रूपयापर्यंतचा दंड व त्यानंतर शाळा अनधिकृत सुरूच राहील्यास प्रतिदिन दहा हजार रूपये दंड करण्याची तरतून करण्यात आली आहे. अशा शाळांवर फौजदारी कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयाने अनधिकृत शाळा बंद करण्याचे आदेश दिले आहे. या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यानचे भविष्य अंधारात आहे.गोंदिया जिल्ह्यात महर्षी विद्या मंदिर गोंदिया, सरस्वती शिशू मंदिर किडंगीपार, गुरूकूल कॉन्व्हेंट दांडेगाव, स्व. नारायण शेंडे कॉन्व्हेंट बनाथर ता. गोंदिया, मुक्तजीवन कॉन्व्हेंट आसोली, एच.एम. पटेल कॉन्व्हेंट विजयनगर गोंदिया, मातोश्री कॉन्व्हेंट छिपीया, सावित्रीबाई शिशू मंदिर दासगाव, टिंक्वल स्टार कॉन्व्हेंट दासगाव, सुपरनोवा पब्लिक स्कूल श्रीनगर गोंदिया, सुपरनोवा पब्लिक स्कूल सहायतानगर गोंदिया, टिंक्वंल स्टार कॉन्व्हेंट कुडवा, शिवाजी एकता कॉन्व्हेंट मुर्री नंगपूरा, गोल्डन पब्लिक स्कूल करटीबुज. ता.तिरोडा, विवेक मंदिर स्कूल पुनाटोली व पूना पब्लिक स्कूल आदर्श कॉन्व्हेंट कहारटोली गोंदिया या १६ शाळा अनधिकृत असल्याची माहिती प्राथमिक शिक्षण विभागाने दिली आहे. (तालुका प्रतिनिधी)फौजदारी कारवाई केव्हा होणार?दरवर्षीप्रमाणे यावर्षीही या अनधिकृत शाळांमध्ये विद्यार्थ्याना प्रवेश दिले जात असल्यामुळे त्या शाळांतील विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात आहे. मात्र मागील अनेक वर्षापासून त्या शाळांना फक्त पत्र दिल्याशिवाय प्राथमिक शिक्षण शिक्षण विभागाने कोणतेही काम केलीे नाही. या अनधिकृत शाळांच्या संचालकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. गोंदिया प्राथमिक शिक्षण विभागाही गुन्हा दाखल करू असे सांगत आहे. मात्र त्या अनधिकृत शाळांवर अद्याप कसलीही कारवाई झाली नाही.