शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
5
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
6
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
7
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
8
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
9
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
10
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
11
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
12
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
13
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
14
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
15
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
16
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
17
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
18
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
19
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
20
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकवर्गणीतून १४३ शाळा डिजीटल

By admin | Updated: July 17, 2016 00:14 IST

प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जात आहेत.

१२९ शाळांत वाचन कट्टा : जिल्हा परिषदेच्या २० शाळांत एज्युकेशन अ‍ॅपचा वापर नरेश रहिले गोंदिया प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र या उपक्रमांतर्गत ग्रामीण व शहरी भागातील प्रत्येक शाळा डिजीटल व्हावी या उद्देशातून प्रयत्न केले जात आहेत. मात्र या शाळा शासनाच्या अनुदानातून नाही तर लोकसहभागातून डिजीटल करण्यास शासनाने सांगितले. आता गावातील शिक्षक आपल्या शाळेला डिजीटल करण्यासाठी नागरिकांकडून वर्गणी घेत आहेत. गेल्या १० महिन्यात जिल्हा परिषदेच्या १४३ शाळा डिजीटल झाल्या आहेत. विज्ञान युगात विद्यार्थ्यांना पाठीवरचे ओझे कमी हवे, तसेच त्यांना एका ‘क्लिक’वर सर्व अभ्यासक्रमांची माहिती मिळावी यासाठी शासनाने पुढाकार घेतला. महाराष्ट्र शासनाने २२ जून २०१५ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र घडविण्याचे स्वप्न सरकारने पाहिले. त्यासाठी ज्ञानरचनावाद, लोकसहभागातून डिजीटल शाळा, एबीएल (कृतीयुक्त अध्यापन), आयएसओ शाळा बनविणे, सीएसआर (कार्पोरेट सोशल रिसपॉन्सीब्लीटी), पीएसआर ( पब्लिक सोशल रिसपॉन्सीब्लीटी) अशा विविध उपक्रमातून जि.प.च्या शाळा व त्यातील विद्यार्थ्यांना हायटेक बनविण्याचे काम शासनाने सुरू केले आहे. त्यामुळे या उपक्रमाला जिल्ह्यात सुरूवात करण्यात आली. तिरोडा तालुक्याला ‘अदानी’चा हातभार आजघडीला गोंदिया जिल्ह्यात १४३ डिजीटल शाळा झाल्या आहेत. त्यात अदानी समूहाच्या मदतीमुळे तिरोडा तालुक्यातील सर्वाधिक शाळा म्हणजेच ३५ शाळा डिजीटल झाल्या आहेत. सडक-अर्जुनी तालुक्यात ७, सालेकसा तालुक्यात ८, गोरेगाव तालुक्यात २७ शाळा, गोंदिया तालुक्यात १८ शाळा, देवरी तालुका ७ शाळा, आमगाव तालुक्यात २८ शाळा व अर्जुनी-मोरगाव तालुक्यात १३ अश्या १४३ शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील २० शाळांमध्ये शिक्षणासंदर्भात व्हिडीओ दाखविण्याचेही काम केले जात आहे. स्क्रिनवर अभ्यासक्रम विद्यार्थ्यांच्या पाठीवरचे ओझे कमी करून शाळेत मल्टीमिडीया प्रोजेक्टरच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमावर आधारीत एज्युुकेशनल सॉफ्टवेअर त्या शाळेत उपलब्ध केले जाते. विद्यार्थ्यांना स्क्रीनवर अभ्यासक्रम आनंददायी पध्दतीने शिकविला जातो. एक शाळा डिजीटल करण्यासाठी जिल्ह्यात दोन ते तीन लाख रूपये खर्च आला आहे. देवरी तालुक्याच्या जेठभावडा या शाळेतील विद्यार्थ्यांच्या हातात तर टॅबलेट आले आहेत. कमी वर्गणीतून मोबाईल डिजीटल शाळा कमी वर्गणी होत असलेल्या शाळांना डिजीटल करण्यासाठी मोबाईलचा आधार घेतला जात आहे. जिल्ह्यात मोबाईल डिजीटल शाळा ३६५ आहेत. त्यात अर्जुनी-मोरगाव तालुका ३६, आमगाव ५२, देवरी २६, गोंदिया ६९, गोरेगाव ६५, सालेकसा ५८, सडक-अर्जुनी १४, तिरोडा ४५ अशा ३६५ शाळा मोबाईल डिजीटल झाल्या आहेत. वाचन कट्यात गोरेगाव पुढे विद्यार्थ्यांना आनंददायी पध्दतीने वाचन करता यावे यासाठी शालेय परिसरातच वाचन कट्टा तयार करण्यात आला. या वाचन कट्ट्यात सुरूवातीला आमगाव तालुका पुढे होता. मात्र आता गोरगाव तालुका पुढे झाला आहे. अर्जुनी-मोरगाव तालुक्यात २, आमगाव ३७, देवरी १५, गोंदिया ५, गोरेगाव ४७, सालेकसा १३, सडक-अर्जुनी ३, तिरोडा ७ अश्या १२९ शाळांत वाचन कट्टा तयार करण्यात आला आहे.