शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
2
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
3
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
4
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
5
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
6
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
7
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
8
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
9
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
10
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
11
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
12
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
13
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
14
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
15
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
16
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
17
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
18
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
19
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
20
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

१३,१६७ मतदार बजावणार हक्क

By admin | Updated: May 29, 2016 01:56 IST

शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२९) मतदान होणार आहे. यासाठी मतदानाच्या हालचाली सुरू झाल्या असून ....

आज पोटनिवडणूक : उद्या होणार मतमोजणीगोंदिया : शहरातील प्रभाग क्रमांक १ मधील रिक्त जागेसाठी रविवारी (दि.२९) मतदान होणार आहे. यासाठी मतदानाच्या हालचाली सुरू झाल्या असून शनिवारी (दि.२८) कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. या निवडणुकीत प्रभागातील १३ हजार १६७ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. अनिल पांडे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या रिक्त झालेल्या जागेसाठी ही पोटनिवडणूक होत आहे. या पोटनिवडणुकीत सहा उमेदवार रिंगणात आहेत. मात्र रिक्त झालेली ही जागा आपल्याकडे खेचून काढण्यासाठी राष्ट्रीय पक्षांसह अपक्ष उमेदवारांनीही जोर लावला आहे. यामुळेच प्रभागात राष्ट्रीय पक्षांच्या उमेदवारांनाही प्रचारासाठी जोर लावल्याचे दिसून आले. यामुळेच अवघ्या शहराचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, रविवारी (दि.२९) या पोटनिवडणुकीसाठी मतदान होणार आहे. यात प्रभागातील १३ हजार १६७ मतदान मतदानाचा हक्क बजावणार आहे. यासाठी प्रभागातील संत तुकाराम हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालात ४, जेठाभाई माणिकलाल हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात ४, सरस्वती महिला विद्यालयात २ व नमाद महाविद्यालयात ३ मतदान केंद्र देण्यात आले आहे. अशाप्रकारे एकूण १३ इलेक्ट्रॉनिक मशिन्सवर हे मतदान घेतले जाणार आहे. मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी सोमवारी (दि.३०) हिंदी टाऊन शाळा परिसरातील स्वर्ण जयंती कार्यालयात सकाळी १० वाजतापासून मतमोजणी सुरू होणार आहे. मतदानासाठीच्या या तयारीला शनिवारी (दि.२८) सुरूवात झाली व स्वर्ण जयंती कार्यालयातून कर्मचाऱ्यांना साहित्य वाटप करण्यात आले. विशेष म्हणजे शहरातील प्रभागासाठी शहरातीलच शाळांचे केंद्र ठेवण्यात आल्याने सर्वच केंद्रांना संवेदनशील गृहीत धरून त्यांच्यावर चोख पोलीस बंदोबस्त व त्यानुसार व्यवस्था करण्यात आल्याचे प्रभागी मुख्याधिकारी व अप्पर तहसीलदार के.डी.मेश्राम यांनी सांगितले. (शहर प्रतिनिधी) १३ मतदान केंद्रांवरून होत असलेल्या या पोटनिवडणुकीसाठी ६५ कर्मचाऱ्यांची ड्युटी लावण्यात आली आहे. यात एका केंद्रांवर एक केंद्राध्यक्ष व चार मतदान अधिकारी राहतील. हे कर्मचारी आमगाव व देवरी तालुक्यातील असून यांत शिक्षक, पंचायत समिती व राज्य कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. शिवाय नगर परिषदेचे कर्मचारी वेगळे असून पोलीस बंदोबस्तही वेगळा आहे.न.प. क्षेत्रातील मद्यविक्र ी बंदनगर परिषदेच्या प्रभाग क्र मांक १ मधील पोटनिवडणूकीसाठी २९ मे रोजी मतदान होणार आहे. ३० मे रोजी सकाळी १० वाजता स्वर्णजयंती कार्यालय, नगरपरिषद टाऊन शाळा येथे मतमोजणी होणार आहे. मतदान व मतमोजणीच्या दिवशी कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून तसेच निवडणूक मुक्त व निर्भय वातावरणात पार पडावी या उद्देशाने मतदानाच्या आधीचा संपूर्ण दिवस, २९ व ३० मे रोजी मतमोजणी संपेपर्यंत नगर परिषद हद्दीतील सर्व प्रकारची परवानाधारक मद्यविक्र ीची दुकाने बंद राहणार आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्या परवानाधारकाविरूद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी गोंदिया यांनी कळविले.