शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

१२३ शेतकऱ्यांच्या पैशाचे गौडबंगाल

By admin | Updated: September 28, 2015 02:10 IST

शेतीविषयक माहिती आपल्याला मिळावी यासाठी १२३ शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ मासिकासाठी जमा केलेली रक्कम गायब झाल्याने गावातील

परसवाडा : शेतीविषयक माहिती आपल्याला मिळावी यासाठी १२३ शेतकऱ्यांनी ‘शेतकरी’ मासिकासाठी जमा केलेली रक्कम गायब झाल्याने गावातील शेतकऱ्यांमध्ये चांगलाच असंतोष पसरला. दरम्यान या मुद्द्यावरून ग्रामपंचायत सदस्य सरिता बाबुलाल परिहार यांनी कृषी सहायकावर दबाव टाकत गावकऱ्यांनाही धमकी दिल्याचा आरोप तंटामुक्त समितीच्या अध्यक्षासह इतर गावकऱ्यांनी केला आहे.प्राप्त माहितीनुसार, तिरोडा तालुका कृषी विभागांतर्गत शेतकऱ्यांना तांत्रिक माहिती व मार्गदर्शनासाठी कृषी सहायक सलामे यांनी मागील वर्षी शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजनेंतर्गत उन्हाळी धानपीक प्रात्यक्षिक दिले होते. त्याचवेळी ‘शेतकरी’ मासिक घेण्यासाठी शेतकऱ्यांना सूचविले. शेतकऱ्यांनी शेतीविषयक माहिती मिळेल म्हणून त्यासाठी प्रतिशेतकरी १५० रूपये गोळा केले. कृषी सहायक सलामे यांनी ग्रामपंचायत सदस्य सरिता परिहार यांचे पती व पाणलोट समितीचे सचिव बाबुलाल परिहार यांच्याकडे ती जमा करण्यास सांगितले. त्यानुसार एकूण २५० शेतकऱ्यांनी १५० प्रमाणे ३७ हजार ५०० रूपये जमा केल्याचे सांगितले जात आहे. मात्र एक वर्षाचा काळ लोटूनही शेतकऱ्यांना मासीक मिळाले नाही. २२ आॅगस्ट रोजी झालेल्या ग्रामसभेत शेतकऱ्यांनी पाणलोट सचिव बाबुलाल परिहार यांना विचारले असता कृषी सहायक सलामे यांच्याकडे ती रक्कम दिली असल्याचे त्यांनी सांगितले. पण कृषी सहायक सलामे यांनी फक्त १२७ शेतकऱ्यांचे पैसे मिळाले असल्याचे गावकऱ्यांना सांगितले. ते पैसे शेतकऱ्यांना परत करणार असे म्हणून कृषी सहायक सलामे यांनी दि. २४ सप्टेंबरला ग्राम पंचायत कार्यालयात येऊन १२७ शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करणे सुरु केले असताना ग्रामपंचायत सदस्य सरिता परिहार यांनी कृषी सहायकावर दबाव टाकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.१२३ शेतकऱ्यांचे नाव यादीत नसल्याने पाणलोट सचिव परिहार यांनी ते पैसे हडप केले, असा आरोप त्यावेळी काही शेतकऱ्यांनी केला असता ग्रा.पं. सदस्य सरीता परिहार यांनी आपल्या पतीवरील आरोप फेटाळून लावत त्या लोकांना शिवीगाळ केल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला. यावेळी कृषी सहायक सलामे यांना सचिव परिहार आल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांचे पैसे परत करा, असाही दबाव ग्रामपंचायत सदस्याने टाकल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे.पाणलोट सचिव व ग्रामपंचायत सदस्यपदाचा दुरूपयोग करीत असून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी तंमुस अध्यक्ष गुड्डू परिहार, जितेंद्र बिसेन, टोई बिसेन, पुष्पराज परिहार, तेजराम पटले, हौशीलाल बिसेन या शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)