शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

१२३ शेततळ्यांनी खोसेटोलाचे सिंचन

By admin | Updated: December 23, 2016 01:02 IST

राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या

४ मीटर वाढले भूजल स्तर: १६३ कुटुंबांचे २९.५३ टक्के सिंचन क्षेत्र नरेश रहिले ल्ल गोंदिया राज्यात पाण्याच्या दुष्काळाचा सामना करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियानाने पहिल्या टप्यात गोरेगाव तालुक्याच्या खोसेटोला गावाचे चित्र बदलविले. जलयुक्त शिवार अभिायानामुळे तयार करण्यात आलेल्या शेतळ्यामुळे या गावाचे २९.५३ टक्के सिंचन वाढले आहे. या अभिायानामुळे ३ ते ४ मीटर पाण्याची भूजल पातळी वाढली आहे. १६३ कुटुंब असलेल्या खोसेटोला या गावाची लोकसंख्या ८०९ आहे. या गावाचे खरीप क्षेत्र २९४.६० हेक्टर आहे. यातील २६४ हेक्टरमध्ये धानाचे पीक घेतले जाते. येथील मुख्य व्यवसाय शेती आहे. धानाचे उत्पादन तसेच धुऱ्यांवर तूरीचे उत्पादन घेतले जाते. गावात सिंचनाची सुविधा नसल्यामुळे शेतकरी फक्त पिके घेत नव्हते. पावसाळ्यात पाऊस वेळेवर आला नाही तर त्याचा विपरीत परिणाम धान उत्पादनावर होत होता. पाण्याच्या अभावामुळे रबी पिके घेतली जात नव्हती.परंतु सन २०१५-१६ या वर्षात खोसेटोला गावाची जलयुक्त शिवार अभियानात निवड झाली. तालुका कृषि अधिकारी मंगेश वावधने यांनी वेळोवेळी सभा घेतली. प्रत्यक्ष भेंटून शेतकऱ्यांना योजनेचे महत्व सांगून जनजागृती करण्यात आली. गावात २३ शेततळे तयार करण्यात आले. जिल्ह्यातील हे गाव आता शेततळ्यांचे गाव म्हणून ओळखले जाऊ लागले. या गावात ४०.२६ टीसीएम पाणी उपलब्ध झाले आहे. आता या गावाचे ८० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. सप्टेंबर महिन्यात धान गर्भावस्थेत असताना त्याला २५० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु तालुक्यात प्रत्यक्षात २२२ मि.मी. पाऊस होतो. आॅक्टोबर महिन्यात दाना भरतेवेळी २०० मि.मी. पाण्याची गरज असते. परंतु ९६ मि.मी. पाऊस येतो.परंतु शेतकऱ्यांकडून तयार करण्यात आलेल्या शेततळ्यांमुळे आता सिंचनासाठी पाणी मिळू लागला त्यामुळे उत्पादनात वाढ झाली आहे. रबी पिकासाठीही मूबलक पाणी उपलब्ध आहे. या अभियानामुळे भूजल स्तर वाढल्याने विहीरीचे पाणी वरच आहे. या विहीरीच्या पाण्यामुळे गहू, हरभरा, जवस व भाजीपाल्याची उत्पादन घेतले जात आहेत. पशूपालनासाठी चाऱ्याचे उत्पादन घेऊन शेतकरी आर्थिक मिळकत मिळवत आहेत. जलयुक्त शिवार अभियानापूर्वी शेतकरी रबीत गहू, हरभरा, जवस, भाजीपाला, चारा असे ६१.४ हेक्टर मध्ये उत्पादन घेत होते. परंतु अभियानानंतर २०७.९ हेक्टर मध्ये घेण्यात येते. या गावाचे भूजलस्तर ३०-४० मीटर होता. आता 20-30 मीटर आहे. आधी १०-११ महिने पाणी उपलब्ध राहात होता आता १२ महिने पाणी उपलब्ध असते. आधी विहीरींची भूजल पातळी ९-१० होता. आता ७-८ मीटर आहे. १३५० लीटर दुग्ध संकलन ४कृषि विभागाच्या माध्यमातून खडकाळ जमीनीवर शाश्वत शेती अभियान कार्यक्रमांतर्गत ८८ जर्सी व होस्टन फ्रिजन जातीच्या दुधाळू गायी वाटप करण्यात आल्या. यामुळे शेती बरोबर पशूपालन व दुग्ध व्यवसाय पूरक व्यवसाय म्हणून केले जात आहे. गावातून १३५० लीटर दुग्ध संकलन केले जाते. ‘‘जलयुक्त शिवार अभियानामुळे कृषि विभागाच्या माध्यामातून शेतात ४५ बाय २० मीटरची शेततळी तयार करण्यात आली. त्यामुळे मुबलक पाणी उपलब्ध आहे. धान लावण्यासाठी या पाण्याचा वापर होत आहे. रबीत गहू, जवस, हरभरा ही पिके घेतली जातात. भविष्यात या शेततळ्यांमध्ये मत्स्यपालन करण्याचा विचार आहे. खोपचंद बिसेन लाभार्थी शेतकरी खोसेटोला