शहरं
Join us  
Trending Stories
1
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
2
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
3
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
4
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
5
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
6
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
7
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
8
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
9
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
10
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
11
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
12
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
13
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
14
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
15
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
16
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
17
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
18
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
19
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
20
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात ११८ कोटींच्या पीक कर्जाचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 19, 2017 00:23 IST

राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यातील निकषामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया रखडली होती.

केवळ ६५ शेतकऱ्यांनी केली अग्रीम रकमेची उचल अंकुश गुंडावार। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर त्यातील निकषामुळे पीक कर्ज वाटपाची प्रक्रिया रखडली होती. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून पीक कर्ज वाटपाला गती आली असून आतापर्यंत गोंदिया जिल्ह्यातील २७ हजार शेतकऱ्यांना ११८ कोटी रुपयांचे पीक कर्जाचे वाटप झाले. कर्जमाफीचे आदेश बँकापर्यंत पोहचण्यास विलंब झाल्याने सुरूवातीला पीक कर्ज वाटप संथ गतीने सुरू होते. पण, मागील पंधरा दिवसांपासून यातील अडचणी दूर झाल्यानंतर पीक कर्ज वाटपाला गती आली. शेतकऱ्यांना राष्ट्रीयकृत बँकापेक्षा जिल्हा बँकेतून कर्जाची उचल करणे सोयीचे वाटत असल्याने जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतून आतापर्यंत जिल्ह्यातील २३ हजार ४३२ शेतकऱ्यांनी पीक कर्जाची उचल केली आहे. तर राष्ट्रीयीकृत बँकेतून ४ हजार ७५ शेतकऱ्यांनी ३० कोटी ५० लाख रुपयांच्या पीक कर्जाची उचल केली आहे. जिल्हा आणि राष्ट्रीयीकृत बँकांनी एकूण ११८ कोटी रुपयांच्या पीक कर्जाचे वाटप केले. तर आत्तापर्यंत २७ हजार ५०७ शेतकऱ्यांनी पीक विमा काढला. गेल्या दोन तीन वर्षांपासून शेतकऱ्यांना पीक विम्याचा लाभ मिळत नसल्याने पीक कर्जाची उचल न करणारे शेतकरी स्वत:हुन पीक विमा काढत नसल्याचे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये आहे. पीक विमा लागू करा शासनाने काही जिल्ह्यात सुरू केलेल्या हवामानावर आधारित पीक विमा योजनेचा शेतकऱ्यां्ना चांगला लाभ मिळत आहे. पण, ही योजना काही मोजक्याच पिकांसाठी लागू आहे. ही योजना सरसकट सर्वच पिकांसाठी लागू केल्यास त्याचा शेतकऱ्यांना लाभ होऊ शकतो. पिक विम्याचा जोखीमस्तर वाढविण्याची गरज असल्याचे कृषी तज्ञांनी सांगितले.