शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बॅडमिंटन हाॅलमध्ये ११६ खाटांचे कोविड केअर सेंटर होणार सुरु ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 28, 2021 04:31 IST

प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल : राजेंद्र जैन यांनी केली पाहणी : सर्व सुविधायुक्त असणार सेंटर गोंदिया : जिल्ह्यात ...

प्रफुल्ल पटेल यांच्या चर्चेनंतर पाऊल : राजेंद्र जैन यांनी केली पाहणी : सर्व सुविधायुक्त असणार सेंटर

गोंदिया : जिल्ह्यात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड केअर सेंटरची संख्या वाढविण्याबाबत खा. प्रफुल्ल पटेल यांनी पालकमंत्री नवाब मलिक यांच्याशी चर्चा केली होती. त्यानंतर जिल्हा प्रशासनाने जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १३६ खाटांचे सर्व सुविधायुक्त कोविड केअर सेंटर सुरु करण्याची प्रक्रिया सुरु केली होती. या कोविड केअर सेंटरची माजी आ. राजेंद्र जैन यांनी मंगळवारी भेट देऊन पाहणी केली. तसेच तेथील सोयी सुविधांचा आढावा घेतला.

येथील जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन हॉलमध्ये १३६ खाटांचे कोविड केअर सेंटर उभारण्याचे काम सध्या युद्ध पातळीवर सुरु आहे. येथे नवीन बेड, बिछाने, तसेच ऑक्सिजन पाईपलाईन टाकण्याचे काम सुद्धा युद्ध पातळीवर सुरु आहे. येत्या २ मे पासून हे कोविड केअर सेंटर रुग्णांसाठी उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे १२२ बेडसाठी कूलर तसेच १४ वातानुकूलित बेड असणार आहेत. या कोविड केअर सेंटरचे काम जि. प. मुख्यकार्यकारी अधिकारी प्रदीप कुमार डांगे यांच्या नियंत्रणाखाली सुरु आहे. या कोविड केअर सेंटरमध्ये दाखल रुग्णांवर उपचार करण्याची जबाबदारी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयावर सोपविण्यात आली असून अधिष्ठाता डॉ. नरेश तिरपुडे हे सुद्धा यावर लक्ष ठेवून आहेत. कोविड केअर सेंटरमुळे रुग्णांची होणारी गैरसोय टाळण्यासही मदत होणार आहे. माजी आ. राजेंद्र जैन यांनी मंगळवारी (दि.२७) सकाळी जिल्हा क्रीडा संकुलाला भेट देऊन तेथील कामाची आणि सोयी सुविधांची पाहणी केली. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नानू मुदलीयार, नगर सेवक विनीत शहारे, सुनील पटले, शैलेश वासनिक उपस्थित होते.

..........

खाटांची वाढविण्याची गरज पडल्यास वाढविण्याची तयारी

जिल्हा क्रीडा संकुलातील बॅडमिंटन सभागृहात १२२ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरु करण्यात येणार आहे. याच सेंटर लगत असलेल्या एका छोट्या हॉलमध्ये सुद्धा १४ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. या खाटा कमी पडल्यास वाढविण्याची तयारी सुद्धा प्रशासनाने ठेवली आहे. खा. प्रफुल्ल पटेल हे दाेन्ही जिल्ह्यातील कोविड परिस्थितीवर लक्ष ठेवून असून सातत्याने जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात आहे.