शहरं
Join us  
Trending Stories
1
२१ तास बैठक झाली, चर्चा फिस्कटली; जे.डी. व्हान्स अमेरिकेत परतणार, इराणने अटी अमान्य केल्या!
2
महिला मतदारांचा वाढता टक्का; यंदाच्या निकालात ठरणार ‘गेमचेंजर’, आसाम, केरळ आणि पुद्दुचेरीत यंदा 'या' मुद्द्यावर महिलांनी केले मतदान
3
भाजप सरकार बंगालमधील ‘सिंडिकेट राज’ संपवेल, अमित शाह यांचं आश्वासन
4
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
5
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
6
घुसखोरांना बंगाल सोडावेच लागेल, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा सक्त इशारा
7
‘....तोपर्यंत मुख्यमंत्रिपदाबाबत चर्चा नाही’, केरळबाबत काँग्रेसने घेतला मोठा निर्णय
8
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
9
कल्याणचे आमदार राजेश मोरे यांना न्यायालयाचा दिलासा, पराभूत प्रमोद पाटील यांची याचिका फेटाळली
10
ऊर्जेसाठी 'पॉवर'फुल भागीदारी, भारताचे परराष्ट्र सचिव मिस्री यांची अमेरिकेचे ऊर्जा सचिव ख्रिस राईट यांच्याशी चर्चा, अणुऊर्जेसह एलपीजी निर्यात आणि कोळसा वायूकरण यावर होणार काम
11
ऐतिहासिक क्षण : ४७ वर्षांनंतर अमेरिका-इराण ‘फेस-टू-फेस’, इस्लामिक क्रांतीनंतर पहिल्यांदाच दोन्ही देशांमध्ये संवादास सुरुवात
12
उत्तर प्रदेशात बोट दुर्घटनेतील मृतांची संख्या पोहोचली ११ वर
13
राज्यात महात्मा फुले कौशल्य विकास प्रशिक्षणाची एक हजार केंद्रे उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
14
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
15
आता उपराजधानीत इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक हेल्थ, १२० कोटींचा निधी मंजूर
16
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
17
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
18
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
19
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
20
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
Daily Top 2Weekly Top 5

मनरेगात ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती

By admin | Updated: May 17, 2017 00:16 IST

तालुक्यात पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्याने ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती करीत जिल्ह्यात.....

रोजगार देण्यात सालेकसा अव्वल : विविध विकास कामांचा समावेश लोकमत न्यूज नेटवर्क सालेकसा : तालुक्यात पंचायत समितीस्तरावर महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तालुक्याने ११३ टक्के उद्दिष्टपूर्ती करीत जिल्ह्यात मनरेगाची कामे उपलब्ध करुन देण्यात अव्वल स्थान प्राप्त केला आहे. शासनाने १०० टक्क्यांचे लक्ष्य ठेवले होते. गोंदिया जिल्ह्याचा पूर्वी टोकावर मध्यप्रदेश व छत्तीसगड राज्याच्यासीमेवर असलेला सालेकसा तालुका विकासाच्या बाबतीत कोसो दूर असून या तालुक्यात मजूर वर्गाचा मोठा भरणा आहे. अनेक लोक कामाच्या शोधात वेळोवेळी शहराकडे पलायन करीत असतात. जर मजुरांना वर्षभर किंवा १००-१५० दिवस काम मिळाले तर शहरातील पलायन थांबविता येऊ शकते. तालुक्यात मजुरांना वेगवेगळी कामे उपलब्ध करुन देऊन या दिशेने एक पाऊल पुढे टाकले असे वाटत आहे. २०१६-१७ या वित्त वर्षात सालेकसा तालुक्याला महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मजुरांना एकंदरित चार लाख ४६ हजार ४६६ दिवस काम देण्याचे लाभ देण्यात आले होते. परंतु सालेकसा तालुक्यात एकंदरित मजुरांना पाच लाख चार हजार ४६० दिवसांचे रोजगार उपलब्ध करुन देण्यात आले. अर्थात दिलेल्या उद्दिष्टला पूर्ण करीत ११३ टक्के दिनाचे काम उपलब्ध करुन देण्यात यश आले आहे. त्यामुळे तालुक्यातील मजूर वर्गाच्या हाताला समाधानकारक काम मिळाल्याचे दिसून येत आहे. ज्या प्रकारचे काम मनरेगा अंतर्गत करण्यात आले त्यात शौचालय निर्मिती, सोस खड्डे, सिंचन विहिरी, घरकुल बांधकाम, गाव तलाव, मैदान सपाटीकरण, रस्ता खडीकरण, पांदण रस्ते, जनावरांचा गोठा, शेळीपालन गोठा बांधकाम, गांढूळ खत निर्मिती, भातखचरे, वृक्ष लागवड आदिंचा समावेश होता. एकंदरित प्राप्त लक्षांक पूर्ण करीत ११३ टक्के कामे करण्यात आली. कामाच्या लक्ष पूर्तीसाठी एपीओ डी.जी. रहांगडाले यांच्या मार्गदर्शनात इंजि. आर.जी.शेंडे, जी.जी. शहारे, एस.एस. बिसेन, आर.टी.लिल्हारे, डी.ए. उपराडे, पी.सी. बारेकर, एस.एस. सिंहारे, विश्वनाथ डोमा, एम.एस. उके, आर.एन. बर्वे, एस.बी. उपराडे, अनिता हरिणखेडे, पंकज चुटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले. येत्या वित्त वर्षात सुद्धा मजुरांना अधिकाधिक मजुरीची संधी दिली जाईल, या दिशेने कामाचा आराखडा तयार करण्यात येत आहे. करण्यात आली ही कामे पंचायत समिती स्तरावर एकून ६५० शौचालय बांधकाम, २४ सोष खड्डे, दोन सिंचन विहिरी, ६१८ घरकुल, सात गाव तलाव, १० मैदान सपाटीकरण, ३२ बर्मी खत केंद्र बनले, १० खत केंद्र प्रस्तावित आहेत. ५१ भात खाचरे बनविण्यात आली. तीन हजार वृक्ष लागवडीचे खड्डे खोदण्यात आले. यासह इतर कामेही करण्यात आली.