शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

आश्रमशाळा शिक्षकांच्या ११ मागण्या मान्य

By admin | Updated: October 1, 2015 02:10 IST

अनुदानित आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या वतीने आदिवासी आश्रमशाळेतील ...

देवरी : अनुदानित आश्रमशाळा शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना गोंदिया व भंडारा जिल्ह्याच्या वतीने आदिवासी आश्रमशाळेतील कर्मचारी आपल्या विविध प्रलंबित मागण्यांना घेऊन आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी देवरीच्या कार्यालयासमोर ५ सप्टेंबरपासून साखळी उपोषणावर बसले होते. याची शासनाकडून दखल न घेतल्याने नंतर १८ सप्टेंबरपासून सदर उपोषणाचे रुपांतर बगमुदत उपोषणात झाले. या उपाषणकर्त्यांचे मागण्यांचे गांभीर्य लक्षात घेवून शासनाने ११ मागण्या पुर्ण केल्याने शुक्रवारी उपोषणाची सांगता करण्यात आली.मागील २० दिवसापासून देवरीच्या प्रकल्प अधिकारी एकात्मीक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय समोर गोंदिया जिल्ह्यातील ६ आदिवासी आश्रमशाळेतील १३ कर्मचारी आपल्या विविध प्रलंबीत मागण्यांना धरुन बेमुदत उपोषणावर बसले होते.या उपोषणाचे गांभीर्य लक्षात घेवून या क्षेत्राचे आ. संजय पुराम, खा. नाना पटोले, शिक्षक आ. ना.गो. गाणार यांनी आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावर, अप्पर आयुक्त आदिवासी विकास विभाग आणि प्रकल्प अधिकारी देवरी यांच्याशी चर्चा करुन सदर मागण्यांना मार्गी लावण्याकरीता प्रयत्न केले.या मागण्यांमध्ये जून २०१५ पासून नियमीत वेतन अदा करणे, पहारेकरी पदाला मानधन देणे अशा ११ मागण्यांचा यात समावेश आहे. इतर प्रमुख मागण्यांबाबत आदिवासी विकास विभागाकडून दखल घेण्यात आली आहे. या बाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असे आदिवासी विकास मंत्री विष्णुजी सावरा यांनी २३ सप्टेंबर रोजी संघटनेचे पदाधिकाऱ्यांना सांगितले. आदिवासी विकास मंत्री यांच्या चर्चा करणाऱ्या शिष्टमंडळात अध्यक्ष एस.आर. शर्मा, उपाध्यक्ष बी.एस. फुंडे, सचिव विलास सपाटे, सदस्य रविशंकर झिंगटे, पी.आर. भांडारकर आणि जे.पी. खुणे यांचा समावेश होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशीही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी २० सप्टेबर रोजी भेट घेवून सदर १३ कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांबाबत चर्चा केली असता त्यांनीही याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे सांगितले होते. आणि तसे निर्देश ही आदिवासी विकास विभागाला दिले होते.२० दिवसापासून सुरु असलेल्या या बगमुदत उपोषणाची सांगता देवरी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम, देवरीचे ठाणेदार राजेंद्र तिवारी, शिक्षक परिषदेचे अध्यक्ष लिलेश्वर बोरकर, भाजपाचे देवरी तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार, सामाजिक कार्यकर्ता आनंदराव तळपते व श्रीकृष्ण हुकरे यांच्या हस्ते निंबूपाणी पाजून करण्यात आली. मागील अनेक दिवसापासून आपल्या मागण्यांना घेऊन उपोषणावर बसलेल्या या आदिवासी आश्रम शाळांतील शिक्षकांना दीर्घ प्रतिक्षेनंतर न्याय मिळाला आहे. (प्रतिनिधी)