शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
2
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
3
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
4
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
5
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
6
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
7
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
8
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
9
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
10
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
11
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
12
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
13
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
14
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
15
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
16
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
17
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
18
ज्या आवाजाने कोट्यवधी रसिकांचं मन जिंकलं, त्यांच्याच हातची चवही होती कमाल! आशाताईंनी उभारलं होतं हॉटेल साम्राज्य
19
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
20
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
Daily Top 2Weekly Top 5

इफ्फीस्थळी आंदोलन चुकीचे

By admin | Updated: November 24, 2015 01:32 IST

पणजी : भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी येऊन इफ्फीस्थळी आंदोलन करणे हे चुकीचे

पणजी : भारतीय फिल्म व टेलिव्हिजन संस्थेच्या (एफटीआयआय) विद्यार्थ्यांनी येऊन इफ्फीस्थळी आंदोलन करणे हे चुकीचे आहे, असे मत मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे व्यक्त केले. इफ्फीस्थळी चित्रपट महोत्सव संचालनालयाकडून छळ होत असून आम्ही नजरकैदेत असल्यासारखेच आहोत, असे या विद्यार्थ्यांनी रविवारी पणजीत पत्रकारांना सांगितले होते. यासंदर्भात पत्रकारांशी मुख्यमंत्र्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, की या विद्यार्थ्यांचा प्रश्न हा गोवा राज्याशी संबंधित नाही. आंदोलन करण्याचा अधिकार सर्वांनाच असतो; पण या विद्यार्थ्यांनी इफ्फीस्थळी येऊन निषेधात्मक आंदोलन करणे मी मान्य करत नाही. इफ्फी हा आंतरराष्ट्रीय सोहळा असून अशा सोहळ्याला गालबोट लागल्यास गोव्याची प्रतिमा खराब होईल. गोवा हे पर्यटन राज्य आहे याचा विचार व्हायला हवा. मुख्यमंत्री म्हणाले, की या विद्यार्थ्यांचा राज्य सरकारशी वाद नाही. त्यांनी योग्य व्यासपीठावर स्वत:चे म्हणणे मांडायला हवे. ते आपल्याला येऊन भेटले असते तर तो विषय वेगळा असता. त्यांनी आपल्याला भेटावेच, आपण त्यांना मदत करीन; पण इफ्फीस्थळी निषेध नोंदविणे योग्य नव्हे. या विद्यार्थ्यांचा इफ्फीस्थळी छळ केला जात आहे, असे मला वाटत नाही. (खास प्रतिनिधी)