शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
2
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
3
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
4
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
5
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
6
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
7
Virat Kohli New Record : विराट कोहलीनं रचला इतिहास; MI विरुद्ध जे कुणालाच नाही जमलं ते करून दाखवलं
8
ठाणे महानगरपालिकेचा भोंगळ कारभार, २४ तासांचा शटडाउन, ३६ तास उलटले तरी नागरिकांना पाणी नाही!
9
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
10
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
11
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
12
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
13
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
14
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
15
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
16
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
17
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
18
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
19
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
20
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
Daily Top 2Weekly Top 5

१४०० विद्यार्थी पदवी प्रवेशाविना

By admin | Updated: July 5, 2015 01:38 IST

महाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.

वासुदेव पागी ल्ल पणजीमहाविद्यालयात प्रवेश न मिळाल्यामुळे अडलेल्या विद्यार्थ्यांची संख्या १४००च्या घरात पोहोचली आहे. बारावीच्या पुरवणी परीक्षा निकालानंतर या संख्येत ८७३ विद्यार्थ्यांची भर पडली आहे.बारावीच्या परीक्षेनंतर विज्ञान, वाणिज्य व कला विभागाच्या पदवी अभ्यासक्रमासाठी स्पर्धा निर्माण झाली होती. विद्यार्थी प्रवेशाविना राहिल्यामुळे महाविद्यालयांत राज्यात ५००हून अधिक मुले ही प्रवेशाविना राहिली होती. बारावीच्या पुरवणी परीक्षेनंतर त्यात ८७३ विद्यार्थ्यांची भर पडून ही संख्या १४००वर गेली आहे. त्यामुळे राज्यात महाविद्यालयीन प्रवेशाबाबत समस्या निर्माण झाली आहे.वाणिज्य व कला विभागात ही समस्या सर्वाधिक असून म्हापसा, पणजी, मडगाव, केपे या ठिकाणी अत्यंत बिकट परिस्थिती आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे वर्ष वाया जाण्याचा धोका निर्माण झाला आहे. मडगाव भागात अधिक विद्यार्थी प्रवेशाविना राहिले आहेत. काणकोण, पेडणे, डिचोली, वाळपई, सांगे या भागात प्रवेशाची समस्या नाही; परंतु उर्वरित भागात कमी-अधिक प्रमाणात ती आहे. उच्च शिक्षण विभागाचे संचालक भास्कर नायक यांनी प्रवेशाची समस्या झाली, ही वस्तुस्थिती असल्याचे सांगितले. त्यासाठी साधनसुविधा असलेल्या काही महाविद्यालयांना नवीन वर्ग सुरू करण्यासाठी मंजुरीही देण्यात आली आहे; परंतु सर्वच महाविद्यालयांत अशा साधनसुविधा नसल्यामुळे वर्ग मंजूर करण्यासाठीही मर्यादा येत असल्याचे ते म्हणाले.पदवी अभ्यासक्रमाच्या एका वर्गात नियमानुसार जास्तीत जास्त ६० विद्यार्थी असू शकतात. त्यात किंचित बदल करून प्रत्येक वर्गात अतिरिक्त १० विद्यार्थी घेण्यासाठी मंजुरी देण्यात यावी, असा प्रस्ताव उच्च शिक्षण खात्याकडून गोवा विद्यापीठाकडे पाठविला असल्याची माहिती भास्कर नायक यांनी दिली. अद्याप या प्रस्तावाला मंजुरी न मिळाल्यामुळे प्रवेशाची समस्या कायम आहे.