शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
2
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
3
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
4
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
5
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
6
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
7
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
8
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
9
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
10
इराणने अशी कोणती मिसाईल डागली? इस्रायलमध्ये ना अलर्ट आला ना सायरन वाजला; हायफावर कोसळली...
11
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
12
"वाटलं भारताने अण्वस्त्र हल्लाच केला, पाकिस्तानकडे फक्त...', नेमकं काय म्हणाले बिलावल भुट्टो
13
KL राहुलनं शतकी खेळीसह साधला विक्रमी डाव! लिटल मास्टर गावसकरांसह द्रविडलाही टाकले मागे
14
'मी राज्यसभेवर जाणार नाही...', स्वतः अरविंद केजरीवालांनी लावला चर्चांना पूर्णविराम
15
इराण-इस्त्रायल युद्ध पेटले! ४० मिनिटे इस्रायलवर क्षेपणास्त्रांचा मारा, थरकाप उडवणारे व्हिडिओ व्हायरल!
16
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
17
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार
18
“विकासासाठीचा प्रत्येक रुपया सर्वसामान्यांपर्यंत पोहोचला पाहिजे”: DCM एकनाथ शिंदे
19
तिसऱ्या महायुद्धाला तोंड फुटण्याची भीती...! इराण इस्रायल युद्धात आणखी एका देशाची उडी; कुणाला देणार साथ?
20
“भास्कर जाधव नौटंकी, जनताच संन्यास देणार, तो काही एवढा मोठा माणूस नाही”; कुणी केली टीका?

कुजबूज--आणखी दोन

By admin | Updated: May 7, 2014 00:47 IST

युरीचे काकाप्रेम

युरीचे काकाप्रेमचर्चिल आलेमाव हे युरी आलेमाव यांचे काका. ज्योकिमचे पुत्र असलेले युरी यांचे म्हणे काकांवर खूप प्रेम आहे. ज्योकिम व चर्चिलचे अधूनमधून पटत नाही. चर्चिलने काँग्रेस पक्ष सोडला तरी, आपण काँग्रेसला सोडणार नाही, असे ज्योकिमबाब ठामपणे सांगतात. चर्चिल व ज्योकिम एकमेकांशी मध्यंतरी बोलतही नव्हते. युरी आलेमाव यांचे काकांवरील प्रेम लोकसभा निवडणुकीवेळीही उफाळून आले होते. युरी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवा शाखेचे अध्यक्ष आहेत. चर्चिलने काँग्रेसमध्ये बंडखोरी केली व काँग्रेसला रामराम ठोकत अपक्ष निवडणूक लढवली. चर्चिलला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने तिकीट द्यावे, असे पत्र युरीने राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष पवार आणि केंद्रीय नेते प्रफुल्ल पटेल यांना पाठवले होते. या पत्राची अगोदर कुणाला कल्पना आली नाही. आता ते पत्र बाहेर फुटले आहे. युरीने अशा प्रकारचे पत्र पाठवले होते याची चर्चा आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस पक्षाच्या दक्षिणेतील नेत्यांमध्ये सुरू आहे. चर्चिलला तिकीट द्यावे, असे पटेल यांनाही म्हणे वाटत होते. खरोखर राष्ट्रवादीने चर्चिलला दक्षिणेत तिकीट दिले असते व काँग्रेसशी आपली युती तोडली असती, तर काँग्रेसची अधिक अडचण झाली असती, हे वेगळे सांगायला नको. मलेशिया भेटीवरच कायम असणारे युरी आता पुन्हा सांगे मतदारसंघात नव्याने सक्रिय होणार आहेत, असे सांगण्यात आले. माविन काँग्रेसमध्येचमाविन गुदिन्हो हे काँग्रेस पक्ष सोडून भाजपात जातील, अशी हवी निर्माण झालेली असली तरी, प्रत्यक्षात गुदिन्हो हे २०१७ सालापर्यंत काँग्रेस पक्ष सोडणार नाहीत, असे त्यांच्या नजीकचे काही लोक सांगतात. गुदिन्हो हे मगो पक्षामध्ये तणाव निर्माण व्हावा म्हणून उगाच विधाने करत आहेत, आपण भाजपमध्ये चाललोय अशी हवा तयार करून माविनबाब मगोला आणि काँग्रेसलाही मनस्ताप करत आहेत, असे राजकीय गोटात मानले जात आहे. प्रत्यक्षात वाघ यांनी ज्याप्रमाणे आपण भाजप सोडून काँग्रेसचे लोकसभा तिकीट स्वीकारीन, अशी हवा तयार केली होती. तसेच माविनबाब करत असल्याचे मानले जात आहे. माविनच्या सार्‍या हालचालींवर भाजपचे नेते डॉ. विल्फ्रेड मिस्किता हेही म्हणे नजर ठेवून आहेत. मिस्किता हे काँग्रेसच्या काही आमदारांच्या संपर्कात असतात. काँग्रेसचे जे आमदार माविनच्या विरोधात आहेत, ते मिस्किता यांच्या संपर्कात राहणे पसंत करतात.