शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
3
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
4
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
5
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
6
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
7
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
8
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
9
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
10
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
11
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
12
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
13
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
14
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
15
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
16
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
17
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
18
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
19
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
20
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
Daily Top 2Weekly Top 5

सावर्डेत दीपक पाऊसकर यांचा दणदणीत विजय

By admin | Updated: March 12, 2017 02:26 IST

फोंडा : सावर्डे मतदारसंघातून मगोपचे उमेदवार दीपक पाऊसकर यांनी दणदणीत विजयाची नोंद करताना भाजपचे उमेदवार गणेश गावकर

फोंडा : सावर्डे मतदारसंघातून मगोपचे उमेदवार दीपक पाऊसकर यांनी दणदणीत विजयाची नोंद करताना भाजपचे उमेदवार गणेश गावकर यांचा ५२२१ मताधिक्याने पराभव केला. सकाळी मतमोजणी सुरू झाल्यानंतरचा हा पहिलाच दक्षिण गोव्यातील निकाल होता. मगोपसाठी हा हुरूप आणणारा निर्णय नक्कीच होता. भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांच्या मतदारसंघातील भाजपचा हा पराभव नक्कीच पक्षश्रेष्ठींना विचार करण्यास भाग पाडणारा आहे.गेल्या निवडणुकीत पाऊसकर यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढविताना केवळ दोन हजारांवर मते मिळविली होती. त्यामुळे यंदाचा त्यांचा विजय निश्चितच लक्षणीय ठरलेला आहे. गणेश गावकर यांना त्यांच्या पारड्यात जी मते पडण्याची अपेक्षा होती तेवढी मते उलट दीपक पाऊसकर यांच्या पारड्यात पडल्याने मतदारांनी मतदारसंघातील खाण उद्योग क्षेत्राच्या मंदीचा परिणाम दाखवून दिल्याची चर्चा मतदारसंघात चालू आहे.कॉँग्रेसचे शंकर किर्लपालकर व अपक्ष बाळकृष्ण मराठे यांनी घोर निराशा केली. दीपक पाऊसकर यांना १४,५७४, गणेश गावकर यांना ९३५४, शंकर किर्लपालकर यांना ९९१ तर बाळकृष्ण मराठे यांना १५२ मते मिळाली.विजयानंतर प्रतिक्रिया देताना दीपक पाऊसकर म्हणाले की, गेल्या पाच वर्षांतील नैराश्य लोकांनी मतदानाद्वारे दाखवून दिले आहे. मगो पक्षाचे श्रेष्ठी आणि मतदार यांनी आपल्यावर दाखविलेल्या विश्वासास आपण पात्र ठरू, अशी कामगिरी येत्या पाच वर्षांत आपण करून दाखविणार आहे. खाण उद्योगाकडे मागील सरकारने केलेले दुर्लक्ष व त्यामुळे सावर्डे तसेच अन्य शेजारील भागातील अवलंबित लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. सावर्डे प्रोगे्रसिव्ह फ्रंट या संघटनेचे त्यांनी खास आभार मानले.(प्रतिनिधी)