शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र तापला, अकोला @ ४२, आगामी चार आठवडे राज्याची होरपळ 
2
आजचे राशीभविष्य, १२ एप्रिल २०२६: कामे सहज होतील, विविध लाभ; पण अखंड सावध राहा
3
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांची प्रकृती चिंताजनक, छातीच्या संसर्गाचा ताण येऊन हृदयविकाराचा झटका
4
स्कूल बसचे भाडे ठरवणार प्रादेशिक परिवहन प्राधिकरण; आता वार्षिक नव्हे, मासिक भाडे
5
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना लाभ, कामात यश, कष्टाचे चीज; उधारी परत मिळेल, पण खर्च वाढेल!
6
चंद्राला गवसणी घालून अंतराळवीर सुरक्षित परतले
7
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
8
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
9
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
10
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
11
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
12
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
13
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
14
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
15
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
16
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
17
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
18
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
19
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
20
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

ट्रकमालकांच्या आंदोलनाचा वापर राजकीय स्वार्थासाठी?

By admin | Updated: December 13, 2015 01:44 IST

खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दराची मागणी करणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने रविवारपासून उत्तर गोव्यात

शेखर नाईक ल्ल फोंडा खनिज मालाच्या वाहतुकीसाठी वाढीव दराची मागणी करणाऱ्या अखिल गोवा ट्रकमालक संघटनेने रविवारपासून उत्तर गोव्यात जनसंपर्क रॅली काढण्याचे ठरवले आहे. वाढीव वाहतूक दर मिळेपर्यंत खनिज वाहतूक सुरू करू देणार नसल्याची संघटनेची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनी ट्रकमालकांचे आंदोलन खपवून घेतले जाणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच खाणपट्ट्यातील आमदारांनी सामंजस्याची भूमिका घेण्याचे आवाहन केल्यामुळे आंदोलनाबाबत अनिश्चितता वाढली आहे. आठ-दहा दिवस अखिल गोवा ट्रकमालक संघटना खनिज वाहतुकीसाठी वाढीव दर मिळावा यासाठी बॉम्बे रोड-पाळी जंक्शन येथे आंदोलन करीत आहे. आंदोलनाला स्थानिक आमदार डॉ. प्रमोद सावंत यांनीही पाठिंबा दिला आहे. मात्र, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी खाणपट्ट्यातील आमदारांचे वैयक्तिक हितसंबंध खाण व्यवसायाच्या आड येऊ न देण्याची तंबी दिल्यामुळे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांचीही कोंडी होण्याची शक्यता आहे. आ. सावंत यांनी माघार घेतल्यास ट्रकमालकांचे आंदोलन फार काळ टिकणार नसल्याची चर्चाही खाणपट्ट्यात सुरू आहे. खास सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी नुकतेच उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे माजी अध्यक्ष शांबा गावस यांना खनिज वाहतुकीसंदर्भात चर्चेसाठी निमंत्रण दिले होते. उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेचे पदाधिकारी त्यानुसार मुख्यमंत्र्यांना भेटूनही आले. मात्र, संघटनेची मुख्यमंत्र्यांशी काय बोलणी झाली याचा तपशील मिळू शकला नाही. सध्या तरी मुख्यमंत्री पार्सेकर यांनी अखिल गोवा ट्रकमालक संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस तसेच अन्य पदाधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात कोणतेही स्वारस्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. तूर्त आंदोलन मागे घ्या, नंतर काय ते पाहू, अशी भूमिका मुख्यमंत्र्यांनी घेतली आहे. महिनाभरात ट्रकमालकांचे आंदोलन विविध वळणांवरून गेल्याचे दिसते. अनेक वर्षे खाण वाहतुकीचे कंत्राट घेणारे शांबा गावस यांनी ट्रकमालकांच्या असंतोषामुळे उत्तर गोवा ट्रकमालक संघटनेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. प्राप्त माहितीनुसार शांबा गावस हे साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सांवत यांचे राजकीय शत्रू असून येणाऱ्या २0१७च्या निवडणुकीत शांबा गावस हे डॉ. सावंत यांच्या विरोधात लढण्याची तयारी करीत आहेत. शांबा गावस यांची उमेदवारी डॉ. प्रमोद सावंत यांना अडचणीची ठरू शकते. त्यामुळे कोणत्याही स्थितीत शांबा गावस यांना खाणपट्ट्यात वरचढ ठरू न देण्याचा चंग डॉ. सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी बांधला आहे. शांबा गावस यांची खरी ताकद असलेल्या ट्रकमालकांना आंदोलनाच्या माध्यमातून आपल्याकडे वळवण्याची खेळी डॉ. सावंत खेळत असल्याची चर्चाही खाणपट्ट्यात सुरू आहे. मुख्यमंत्र्यांनी खाणपट्ट्यातील आमदारांना दिलेल्या तंबीमुळे आमदार डॉ. प्रमोद सावंत यांची गोची होण्याची शक्यता आहे. शांबा गावस यांना मात्र राजकीय प्रवासासाठी प्रोत्साहन मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. प्रत्यक्षात खाणपट्ट्यातील मागील अनेक आंदोलनांवेळी शांबा गावस यांनी ट्रकमालकांची भूमिका सरकार तसेच खाण कंपन्यांकडे व्यवस्थित मांडली होती. यामुळेच त्यांना ट्रकमालकांचा तसेच अन्य खाण अवलंबितांचा पाठिंबा मिळत होता. सध्या शांबा गावस ट्रकमालकांच्या आंदोलनात सक्रिय नसल्यामुळे अखिल गोवा ट्रकमालक संघटनेतर्फे त्यांना एकप्रकारे खलनायकाप्रमाणे रंगवले जात आहे. सरकार दरबारी मात्र शांबा गावस यांना झुकते माप मिळत आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत या खाणपट्ट्यातील मतदारसंघात ट्रकमालक संघटनेचे आंदोलन महत्त्वाची भूमिका बजावण्याची शक्यता व्यक्त होत आहे.