शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात केरळच्या माकम, कुंजुकुंजु भातबियाण्यांचा प्रयोग

By admin | Updated: June 28, 2016 19:27 IST

गोव्यात केरळच्या लाल दाण्याच्या माकम, कुंजुकुंजु या भातबियाण्यांचा प्रयोग या खरिप मोसमात घेतला जात आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाची संततधारचालूच असली

-  महाराष्ट्राचे कर्जत- ३ बियाणेही मानवले : पाऊस भातशेतीला पूरक पणजी : गोव्यात केरळच्या लाल दाण्याच्या माकम, कुंजुकुंजु या भातबियाण्यांचा प्रयोग या खरिप मोसमात घेतला जात आहे. राज्यात गेले काही दिवस पावसाची संततधारचालूच असली तरी त्याचा भात शेतीवर कोणताही परिणाम होणार नसून उलट हा पाऊस लाभदायकच ठरणार असल्याचे कृषी तज्ज्ञांचे मत आहे. येथील कृषी खात्याचे संचालक उल्हास पै काकोडे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की हा पाऊस शेतीला लाभदायकच आहे. यावर्षी केरळची लाल दाण्याची माकम, कुंजुकुंजु ही भात बियाणी प्रयोगासाठी घेतलेली आहेत. गोव्याच्या पारंपरिक ज्योती बियाण्याला पर्याय म्हणून या बियाण्यांकडे पाहिले जाते. गेल्या वर्षीही काही भागात लागवड केली असता गोव्याची हवा या बियाण्याला मानवल्याचे दिसून आले. राज्यातील सासष्टी, तिसवाडी, बार्देस आदी किनारी भागात भात बियाण्याची लागवड पूर्ण झालेली आहे. भात रोपट्यांच्या लागवडीसाठी यावर्षी ट्रान्सप्लांटर आणला असून आता यंत्रवत लागवडीचा मार्गही खुला झाला असल्याचे काकोडे म्हणाले. सासष्टी आणि बार्देस तालुक्यांमध्ये शेतात ट्रान्सप्लांटरचा प्रयोग घेतलेला आहे. राज्यात गेल्या वर्षी सुमारे ३१ हजार हेक्टर जमिनीत भाताची लागवड झाली होती यंदा लागवड क्षेत्रात वाढ करण्याचे उद्दिष्ट आहे. कंत्राटी शेतीला प्रोत्साहन देणे हा त्याचाच एक भाग आहे. याआधीही कर्नाटक, महाराष्ट्रातील वेगवेगळ्या भातबियाण्यांचा यशस्वी प्रयोग गोव्यात झालेला आहे. केरळचे रेवती, महाराष्ट्राचे कर्जत-३ ही बियाणीही शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरली आहेत. कमी पाण्यात तग धरणारी आणि बऱ्यापैकी पिक देणारी बियाणी शेतकरी पसंत करीत असतात. पारंपरिक जया आणि ज्योती या बियाण्यांना पर्याय म्हणून अशा नवनव्या बियाण्यांचा प्रयोग राज्यात होत आहे आणि त्याला येथील शेतकरीही चांगला प्रतिसाद देत आहेत.