शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

...तोपर्यंत वाहतूक बंद

By admin | Updated: April 29, 2016 02:22 IST

फोंडा : खाण खात्याने खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी प्रतितास ४0 किलोमीटर एवढी वेगमर्यादा घातल्याने ट्रकमालकांना

फोंडा : खाण खात्याने खनिज वाहतुकीत शिस्त आणण्यासाठी प्रतितास ४0 किलोमीटर एवढी वेगमर्यादा घातल्याने ट्रकमालकांना दुरुस्ती व डिझेलसाठी अधिक खर्च करावा लागणार आहे. सरकारचा निर्णय ट्रकमालकांना मान्य नसून ट्रकमालक त्याचा निषेध करीत आहेत. जोपर्यंत सरकार अ. गो. ट्रकमालक संघटनेकडे यासंदर्भात विचारविनिमय करीत नाही, तोपर्यंत कोडली ते आमोणा मार्गावरील खनिज वाहतूक शुक्रवारपासून बंद ठेवण्याचा निर्णय संघटनेच्या सभेत घेण्यात आला. ही सभा गुरुवारी वडाकडे-उसगाव येथे झाली. या सभेला संघटनेचे अध्यक्ष नीळकंठ गावस, शिवदास माडकर, शिवाजी नाईक, मंगलदास नाईक, बालाजी गावस व अन्य ट्रकमालक उपस्थित होते. प्रतितास ४0 किलोमीटर वेगाने वाहतूक करताना डिझेल अधिक लागते. तसेच ट्रकांचा दुरुस्ती खर्चही वाढतो. सरकारने यासंदर्भात ट्रकमालकांना विश्वासात घेऊन वेगमर्यादेविषयी चर्चा करण्याची गरज होती; परंतु तसे न करता खाण खात्याने वेगमर्यादा लागू केल्याने अनेक ट्रकांवर कारवाई करण्यात आली. हा निर्णय म्हणजे एकप्रकारे सरकारची हुकूमशाहीच असून ट्रकमालक संघटित नसल्यामुळे सरकार खाण कंपन्यांचे हित जपत आहे. प्रतितास ४0 किलोमीटर वेगाने ट्रक चालवून नुकसान सोसण्यापेक्षा ट्रक बंद ठेवणे ट्रकमालकांसाठी अधिक सोयीस्कर ठरेल, असेही नीळकंठ गावस पुढे म्हणाले. अ. गो. ट्रकमालक संघटनेतर्फे काही महिन्यांपूर्वी वाहतूक दरवाढीसाठी सुमारे चार महिने आंदोलन करण्यात आले होते. मात्र, सरकारची भूमिका पाहता आता वेगमर्यादेमुळे ट्रकमालकांवर ट्रक बंद ठेवण्याची वेळ आल्याचे ते म्हणाले. दरम्यान, खाणबंदीच्या काळात खाणी सुरू व्हाव्यात म्हणून खाण कंपन्यांचे अधिकारी ट्रकमालकांना भडकावून आंदोलने करण्यास भाग पाडीत होते. आता सरकारने वेगमर्यादा लागू केल्यामुळे हेच खाण कंपनीचे अधिकारी पुन्हा ट्रकमालकांना रस्त्यावर उतरण्यास चिथवत असल्याचे खात्रीलायक सूत्रांनी सांगितले. यामुळे एनकेन प्रकारे ट्रकमालकांनाच याचा फटका बसणार. जोपर्यंत सरकार वेगमर्यादेसंबंधी संघटनेशी चर्चा करीत नाही, तोपर्यंत खनिज वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय ट्रकमालक संघटनेने घेतला आहे. (प्रतिनिधी)