डिचोली : जांबोटी परिसरातील मुडगई जंगलात महिलेचा बळी घेणाऱ्या पट्टेरी वाघाला पकडण्यासाठी कर्नाटकाच्या वन खात्यातर्फे मोहीम राबवण्यात आली आहे. शुक्रवारी या मोहिमेवेळी दोनवेळा वाघाचे दर्शन झाले. मात्र, त्याने चकवा दिला. बेळगावचे उपवनसंरक्षक अंबोजी मधू यांनी दिलेल्या माहितीनुसार, बंदिपूर राखीव व्याघ्र क्षेत्र, अणशी दांडेली राखीव वन क्षेत्रात तज्ज्ञ मंडळी शोध मोहिमेत गुंतले आहेत. दरम्यान, बुधवारी अंजना हणबर हिला वाघाने ठार केले होते. तीच्या कुटुंबाला ७ लाखांची भरपाई देण्यासाठी वन खात्याकडून आवश्यक सोपस्कार चालू असल्याचे सांगण्यात आले. (प्रतिनिधी)
‘जांबोटी’त दोन वेळा वाघाचे दर्शन
By admin | Updated: December 27, 2014 01:10 IST