(पान दोन किंवा एक)वाहतूक खात्याची शनिवारपासून मोहीमपणजी : राज्यात वाहतुकीच्या नियमांचा भंग होऊ नये म्हणून वाहनधारकांविरुद्ध येत्या शनिवारपासून वाहतूक खाते व्यापक अशी कारवाई मोहीम सुरू करील, असे वाहतूक खात्याचे संचालक अरुण देसाई यांनी बुधवारी येथे पत्रकारांना सांगितले.दुचाकीस्वारांनी हेल्मेट न घालता वाहन चालविले तर त्याविरुद्ध कारवाई केली जाईलच. शिवाय दुचाकी किंवा चारचाकी वाहनास फॅन्सी क्रमांक पी लावलेली आढळल्यासही कारवाई केली जाईल. तसेच फिल्मिंग केलेल्या काचा असलेले चारचाकी वाहन आढळून आल्यास त्याविरुद्धही दंडात्मक कारवाई केली जाईल, असे देसाई यांनी सांगितले. फॅन्सी क्रमांक पी लावणे तसेच काचांना फिल्मिंग करणे अशा गुन्ांसाठी प्रत्येकी दोन हजार रुपयांपर्यंत दंड देण्याची तरतूद आहे. हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्यास आठशे रुपयांपर्यंत दंड ठोठविता येतो, असे देसाई म्हणाले. वाहतुकीशीसंबंधित नियमांची शनिवारपासून अतिशय काटेकोरपणे कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
वाहतूक खात्याची मोहीम
By admin | Updated: May 8, 2014 01:28 IST