शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
पाकिस्तानात इराण-अमेरिका चर्चा अयशस्वी ठरली तर काय असेल डोनाल्ड ट्रम्प यांना पुढचा प्लॅन?
3
"उस्मान तारिकच्या बॉलिंगवर खेळणार नाही" लाईव्ह सामन्यात डॅरिल मिशेलचा आक्षेप, असं का म्हणाला?
4
संतापजनक! मराठा साम्राज्याचा विस्तार दर्शविणारा नकाशा आठवीच्या पुस्तकातून NCERT ने वगळला
5
१२० किंवा १५० रुपयांऐवजी ₹१२३ किंवा ₹१४८ चं पट्रोल का भरताहेत लोक? राऊंड फिगरमुळे कमी मिळतं का Petrol?
6
Tripti Kalhans : डिप्रेशनवर मात अन् पाचव्या प्रयत्नात बाजी! सलग ४ वेळा नापास झालेली तृप्ती बनली IAS अधिकारी
7
वयाच्या ४२ व्या प्रेग्नंट, तरी जिममध्ये हेवी वर्कआउट करतेय अभिनेत्री; नेटकऱ्यांनी दिला सल्ला
8
गोल्ड ETF मधील गुंतवणूक ५७% नं घसरली, चांदीत सलग दुसऱ्या महिन्यात 'एक्झिट'; आता गुंतवणूकदारांनी काय करावं?
9
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
10
IPL 2026: वैभव सूर्यवंशीच्या बॅटिंगवर किंग कोहली फिदा; सामन्यानंतर दिलं खास गिफ्ट!
11
Tarot Card: तुमचा हा आठवडा भाग्याचा की संघर्षाचा? टॅरो कार्ड्सनुसार वाचा १२ ते १८ एप्रिलचे साप्ताहिक भविष्य!
12
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
13
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
14
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
15
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
16
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
17
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
18
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
19
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
20
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
Daily Top 2Weekly Top 5

अपंग व्यक्तीची ६६ किमी अंतरावरील संस्थेत बदली

By admin | Updated: December 9, 2015 02:10 IST

अपंग व्यक्तीची ६६ किमी अंतरावरील संस्थेत बदली

पणजी : अपंग व्यक्तींच्या कल्याणाची भाषा एका बाजूने सरकारी खाती बोलतात व त्यासाठी मोठे सोहळेही आयोजित करून सत्ताधारी भाषणे देत विशेष व्यक्तींचे गौरवही करतात; पण दुसऱ्या बाजूने सरकारी खाती व एकूणच शासकीय यंत्रणा अपंग व्यक्तींबाबत अतिशय असंवेदनशील बनल्याचा अनुभव येत आहे. सत्तरी तालुक्यातील मोर्ले कॉलनी येथून रामकृष्ण गावस या अपंग सरकारी कर्मचाऱ्याची बदली ६६ किलोमीटर दूर म्हणजे वास्को येथे करण्यात आली असून त्याने याविषयी तक्रार करून न्यायाची मागणी केली, तरी संबंधित सरकारी खात्याच्या संचालकांनी अजून याची दखल घेतलेली नाही. हा विषय ‘लोकमत’ने मंगळवारी आयटीआयशी निगडित क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग खात्याचे मंत्री दीपक ढवळीकर यांच्या नजरेस आणून दिला असता, आपण या विषयात गंभीरपणे लक्ष घालून बदली रद्द करीन, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली. रामकृष्ण गावस हे अगोदर पणजीत क्राफ्ट्समॅन ट्रेनिंग खात्याच्या मुख्यालयात काम करत होते. तिथून त्यांची वास्कोत बदली करण्यात आली. पणजीत येण्यासाठी व पुन्हा मोर्ले येथे जाण्यासाठी बसगाड्या आहेत. त्यामुळे आपली पणजीत येण्यास तक्रार नव्हती, असे गावस यांचे म्हणणे आहे. तथापि, आता त्यांची बदली वास्को येथे करण्यात आली आहे. चार बसगाड्या बदलून आपल्याला जावे लागते. सायंकाळी सात वाजल्यानंतर साखळीहून आपल्या घरी मोर्ले कॉलनी येथे जाण्यासाठी वाहतुकीची व्यवस्थाच नाही. त्यामुळे आपण वास्कोत कामालाच जाऊ शकत नाही, असे गावस यांनी सांगितले. आपली लेखी तक्रार त्यांनी खात्याच्या संचालकांपर्यंत पंधरा दिवसांपूर्वीच पोहचवली आहे. गावस यांच्या पायास ४२ टक्के अपंगत्व आहे; पण खात्याच्या संचालकांनी अजून तक्रारीची दखल घेतलेली नाही, अशी माहिती मिळाली. दरम्यान, सामाजिक कार्यकर्ते सतीश सोनक यांनी सरकारच्या असंवेदनशीलतेचा निषेध केला. (पान २ वर)