शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
2
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
3
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
4
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
5
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
6
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
7
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
8
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
9
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
10
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा
11
भारत अमेरिकेला फसवतोय, युक्रेन युद्धाला मदत करतोय
12
आम्ही दोघे भाऊ २० वर्षांनी एकत्र आलो, तुम्ही का भांडता? राज ठाकरेंनी पहिल्यांदा केले एकत्र येण्यावर भाष्य
13
‘चीन’वरून जुंपली : ‘गलवान’नंतर चीनबाबत सरकारने दिशाभूल केली, काँग्रेसचा हल्लाबोल
14
सच्चे भारतीय असाल, तर असे बोलणार नाहीत; राहुल गांधींना सुप्रीम कोर्टाने सुनावले; दिलासाही दिला
15
टीम इंडियाने दिला नवा मंत्र : BELIEVE...; भारताने ६ धावांनी मिळवलेल्या थरारक विजयाची कारणे, ६ प्रश्नांच्या उत्तरांमध्ये
16
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
17
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
18
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
19
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग

लोबोंसह तिघांवर आरोपपत्र

By admin | Updated: March 12, 2016 02:38 IST

पणजी : बागा समुद्रकिनाऱ्यावर हॉटेल बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कळंगुटचे आमदार मायकल लोबो

पणजी : बागा समुद्रकिनाऱ्यावर हॉटेल बांधकाम करताना सीआरझेड नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल कळंगुटचे आमदार मायकल लोबो व अन्य दोघांवर सीआयडी गुन्हा शाखेच्या पोलिसांनी म्हापसा येथील प्रथमश्रेणी न्यायालयात शुक्रवारी आरोपपत्र दाखल केले. लोबो आणि हॉटेल प्रकल्पातील दोघा भागीदारांना आरोपी केले आहे. गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचा (जीसीझेडएमए) बोगस ना हरकत दाखला सादर केला, तसेच योग्य ते परवाने न घेताच बांधकाम केल्याचा या सर्वांवर आरोप आहे. लोबो व त्यांच्या भागीदारांवर भादंसंच्या कलम ४६८ (खोटारडेपणा), ४७१ (बोगस दाखला खरा म्हणून वापरणे), ४२0 (फसवणूक) व कलम २0१ (पुरावे गायब करणे) या चार कलमांखाली हे आरोपपत्र सादर केले आहे. २0१0 मध्ये गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरणाचे तत्कालीन सदस्य सचिव मायकल डिसोझा यांनी या प्रकरणी लोबो तसेच प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर बोगस ना हरकत दाखल्याबाबत तक्रार केली होती. हॉटेल बांधकामासाठी लोबो यांना सनद दिलीच नसल्याचे उत्तर गोवा दंडाधिकारी कार्यालयातून स्पष्ट केले असून, तसे पत्र गुन्हा शाखेला पाठविले आहे. लोबो यांच्यावर फसवणुकीचा आणि कागदपत्रात फेरफार करण्याचा गुन्हा नोंदविल्यामुळे आणि पोलिसांकडे ठोस पुरावेही असल्यामुळे ते अडचणीत आले आहेत. (प्रतिनिधी)