शहरं
Join us  
Trending Stories
1
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
2
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
3
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
4
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
5
होर्मुझमध्ये अमेरिकेचा 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
6
"...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
7
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
8
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
9
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
10
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
11
GT विरुद्धही भावाला प्लेइंग इलेव्हनमध्ये मिळाली नाही जागा; तरी LSG ला सपोर्ट करताना दिसली सारा तेंडुलकर
12
"मदरशांसाठी 600 कोटींचं बजेट पण विकासासाठी निधी नाही...!" प. बंगालच्या रॅलीतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल
13
बंद घराची कौले काढून चोरी; दहा तोळे सोने व १७ हजारांची रोकड लंपास!
14
Payal Nag : नियतीला झुकवणाऱ्या पायलची सुवर्णगाथा! अपघातात हात-पाय गमावले, तिरंदाजीतून जग जिंकले
15
LSG vs GT : पंतसमोर पहिला डाव जिंकला; गिलचा आनंद गगनात मावेना! 'तो' व्हिडिओ व्हायरल
16
युद्धविराम रद्द झाला तर जगावर मोठे संकट येणार; जागतिक बँकेचे प्रमुख अजय बंगा यांचा इशारा
17
सोशल मीडियाचा अतिवापर आणि अश्लील कंटेंटला बसणार लगाम! इन्स्टाग्रामने आणले नवीन 'टीन रूल्स'
18
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
19
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
20
अमेरिका-इराण चर्चा निष्फळ! पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आली समोर; परराष्ट्र मंत्री इशाक डार म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

तिसरी आघाडी २६ जानेवारीपर्यंत

By admin | Updated: November 24, 2015 01:31 IST

पणजी : तिन्ही अपक्ष आमदारांनी एकसंध असल्याचे स्पष्ट करीत येत्या २६ जानेवारीपर्यंत तिसरी आघाडी स्थापन केली

पणजी : तिन्ही अपक्ष आमदारांनी एकसंध असल्याचे स्पष्ट करीत येत्या २६ जानेवारीपर्यंत तिसरी आघाडी स्थापन केली जाईल, असे संकेत दिले आहेत. २0१७च्या विधानसभा निवडणुकीत त्यामुळे नवीन शक्ती उदयास आलेली दिसेल आमदार सरदेसाई म्हणाले की, आम्ही तिघेही एकत्र आहोत. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसने प्रत्येक बाबतीत बोटचेपे धोरण अवलंबिले आहे. फा. बिस्मार्कसाठी न्याय मागण्यासाठी शांतपणे आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसी बळाचा वापर करून दहशत माजवली जाते. इफ्फीत फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन संस्थेच्या विद्यार्थ्यांचा छळवाद सुरू आहे. राज्यात आणीबाणीसारखी स्थिती असूनही काँग्रेस सत्ताधारी भाजपच्या सुरात सूर मिसळून आहे त्यामुळे आम्हा तिन्ही अपक्ष आमदारांना विरोधकांचा आवाज बनावे लागले आहे. याप्रसंगी अपक्ष आमदार रोहन खंवटे, तसेच आमदार नरेश सावळ हेही उपस्थित होते. खंवटे म्हणाले, फादर बिस्मार्क यांना न्याय मिळावा यासाठी रस्त्यावर उतरलेल्या लोकांना पोलीस बळाचा वापर करून दंडेलशाही दाखवली जाते. तेथे जमलेल्या ज्येष्ठ नागरिकांचीही तमा बाळगली जात नाही, हे दुर्दैवी आहे. (प्रतिनिधी)