शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या आघाडीचा राज्यव्यापी प्रभाव अशक्य

By admin | Updated: November 29, 2015 01:58 IST

पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी

पणजी : राज्यातील तीन अपक्ष आमदार येत्या जानेवारी महिन्यात तिसरी आघाडी स्थापन करू पाहत आहेत. मात्र, सत्ताधारी भाजपने अजून हा विषय गंभीरपणे घेतलेला नाही. भाजपचे आमदार विष्णू वाघ यांना तर तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव निर्माण करू शकणार नाही, असे वाटते. तिसरी आघाडी स्थापन करण्याच्या अपक्ष आमदारांच्या निर्णयाकडे भाजप किंवा आपण कोणत्या दृष्टिकोनातून पाहता, असे वाघ यांना शनिवारी विचारले असता ते म्हणाले की, तिसरी आघाडी राज्यव्यापी प्रभाव टाकू शकेल असे सध्या तरी आपल्याला वाटत नाही. तीन-चार अपक्ष आमदार एकत्र आले म्हणून तिसरा मोठा राजकीय पक्ष तयार होतो किंवा तिसरा मोठा पर्याय लोकांना प्राप्त होतो, असे होत नाही. दर निवडणुकीवेळी गोव्यात तीन-चार अपक्ष आमदार निवडून येतातच. एका बाजूने राष्ट्रीय पक्ष नको असे म्हणायचे व दुसऱ्या बाजूने स्वत:चा प्रादेशिक पक्ष कोणता तेही सांगायचे नाही, अशी अधांतरी स्थिती तिसऱ्या आघाडीबाबत आहे. वाघ म्हणाले की, तिसरा राजकीय पर्याय लोकांना देण्याची भाषा करणाऱ्या अपक्ष आमदारांकडे ठाम अशी वैचारिक भूमिका मला दिसत नाही. प्रादेशिक पक्षच बरा, राष्ट्रीय पक्ष योग्य नव्हे, अशी भूमिका आता काही अपक्ष आमदार करतात; पण गेल्या लोकसभा निवडणुकीवेळी त्यांनी दक्षिण गोव्यात काँग्रेसचे उमेदवार आलेक्स रेजिनाल्ड यांना पाठिंबा दिला होता. रेजिनाल्ड हे राष्ट्रीय पक्षाचे उमेदवार होते. आपणच आपले हायकमांड व्हावे, असे म्हणायचे व राष्ट्रीय पक्षांना दोष देतानाच मडगावमध्ये दिगंबर कामत या काँग्रेसच्या उमेदवाराशी राजकीय हातमिळवणी करायची, हा मोठा विरोधाभास आहे. म्हणूनच मी म्हणतो की नियोजित तिसऱ्या आघाडीला जन्म देऊ पाहणाऱ्या अपक्ष आमदारांकडे स्पष्ट अशी भूमिका नाही. स्पष्ट अशी वैचारिक मांडणी नाही. आम्ही सगळे याच दृष्टिकोनातून तिसऱ्या आघाडीविषयीच्या घोषणेकडे पाहतो. (प्रतिनिधी)