शहरं
Join us  
Trending Stories
1
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
2
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
3
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
4
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
5
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
6
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
7
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
8
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
9
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
10
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
11
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
12
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
13
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
14
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
15
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
16
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
17
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
18
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
19
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
20
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
Daily Top 2Weekly Top 5

तडफडणाऱ्या युवकाला सोडून ते गेले पळून...

By admin | Updated: December 11, 2015 00:20 IST

फोंडा : मध्यरात्री दारूच्या नशेने झिंगलेले ते तिघे आपल्या आलिशान कारला भरधाव वेगाने पळवत बाणस्तारी पुलाजवळ

फोंडा : मध्यरात्री दारूच्या नशेने झिंगलेले ते तिघे आपल्या आलिशान कारला भरधाव वेगाने पळवत बाणस्तारी पुलाजवळ पोहोचले खरे; पण नशेचा अंमल इतका गहिरा होता की, समोरून येणाऱ्या मोटरसायकलस्वाराला त्यांनी पाहिले नाही! ...आणि अघटित घडले. कारच्या धडकेने तो फेकला गेला. कारमधील युवक इतके भावनाहीन की, गंभीर जखमी झालेल्या त्या युवकाला घटनास्थळीच तडफडत ठेवून तिथून पोबारा केला. कदाचित नशिबाने साथ दिली असती, तर हा गुन्हा त्यांना पचलाही असता. मात्र, कारचा टायर फुटल्याने ते जास्त अंतर पार करू शकले नाहीत. बुधवारी रात्री १ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. प्रवीण भानुदास मडकईकर (२४, रा. आशेवाडा-बेतोडा) असे दुचाकीस्वाराचे नाव आहे. प्रवीण आपल्या मोटरसायकलवरून (क्र. जीए 0५ ई 0२८२) फोंड्याहून पणजीच्या दिशेने जात होता. बाणस्तारी पुलावर पोहोचला असता, एका भरधाव कारने (क्र. जीए 0९ ए २२३६) त्याच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली. यात प्रवीण रस्त्यावर फेकला जाऊन गंभीर जखमी झाला. तो रस्त्यावर तडफडत असताना कारचालकासह अन्य दोघांनी त्याला त्याच अवस्थेत सोडून कारमधून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, कारचा टायर फुटल्याने ते कार घेऊन जास्त अंतर पार करू शकले नाहीत. फोंडा पोलिसांनी कार ताब्यात घेऊन अज्ञात चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अपघातास कारणीभूत ठरलेले युवक कोडली-तिस्क येथील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. फोंडा पोलीस स्थानकाचे उपनिरीक्षक पाडलोस्कर तपास करत आहेत. (प्रतिनिधी)