बार्देस : पैशांची अफरातफर केल्याच्या तक्रारीवरून शुक्रवारी म्हापसा पोलिसांनी थिवी कोमुनिदादच्या कार्यकारी मंडळाच्या चार सदस्यांना अटक केल्याने थिवी भागात खळबळ माजली. अटक केलेल्यांपैकी दोघांना अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना म्हापसा येथील आझिलो इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. अटक करण्यात आलेल्यांत थिवी कोमुनिदादचे उपाध्यक्ष लुईस डिसोझा (६३), लोबोवाडा, थिवी, मॅथ्यू डिसोझा (६५), अॅटर्नी व उपखजिनदार एलेक्सझेंडर एस्ट्रेसियो (७३), लिमवाडा-थिवी यांचा समावेश आहे. यापैकी सांतोनिओ फोन्सेका व लुईस डिसोझा याची तब्येत बिघडल्याने त्यांना आझिलो इस्पितळात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. १३ मे २०१४ रोजी फिर्यादी ज्यूड डिलीमा कॅलिक्स डिलीमा व नीलम डिसोझा या सदस्यांनी केलेल्या पोलीस तक्रारीत थिवी कोमुनिदादच्या कार्यकारी मंडळ सदस्यांकडून कोमुनिनादच्या थिवी येथील देना बॅँकेच्या खात्यातून पैशांची अफरातफर करण्यात आल्याचे म्हटले होते. या तक्रारीच्या अनुषंगाने काल म्हापसा पोलिसांकडून चार कार्यकारी मंडळ सदस्यांना अटक करण्यात आली तर जासिंतो सिक्वेरा व पीटर फोन्सेका हे सापडू शकले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, थिवी कोमुनिदादच्या ७ कर्मचारी मंडळ सदस्यांनी मिळून दि. १० मे २०१४ ते १४ मे २०१४ या काळात थिवी कोमुनिदादच्या बॅँक खात्यातून ही पैशांची अफरातफर केली आहे. अनेक वेळा मागणी करूनही गावकऱ्यांना पैशांच्या व्यवहाराविषयी अंधारात ठेवण्यात येत होते. बैठकीत हिशेब सादर करण्यास टाळाटाळ करीत असल्यावरून ही तक्रार करण्यात आली होती. (प्रतिनिधी)
अफरातफर प्रकरणी थिवी
By admin | Updated: July 26, 2014 01:20 IST