शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

आलेक्स सिक्वेरा कॉँग्रेसमधून निलंबित

By admin | Updated: August 24, 2014 00:50 IST

पणजी : कॉँग्रेसचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना निलंबित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केल्यामुळे

पणजी : कॉँग्रेसचे माजी आमदार आलेक्स सिक्वेरा यांना पक्षातून निलंबित करण्यात आले. दक्षिण गोवा जिल्हा अध्यक्ष सुभाष फळदेसाई यांना निलंबित करण्याच्या पक्षाच्या निर्णयावर टीका केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई केल्याचे पक्षाच्या प्रवक्त्या प्रतिमा कुतिन्हो यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत सांगितले. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जॉन फर्नांडिस यांनी ही कारवाई केल्याचे कुतिन्हो यांनी सांगितले. फळदेसाई कॉँग्रेसचे जिल्हा प्रमुख होते आणि लोकसभा निवडणुकीत निवडणूक एजंटही होते; परंतु त्यांनी पक्षविरोधी काम केल्याचे अनेक पुरावे पक्षाला मिळाले आहेत. त्यांच्याविरुद्ध कार्यकर्त्यांच्या अनेक तक्रारीही होत्या. निलंबनापूर्वी स्पष्टीकरण मागणारी रीतसर नोटीस त्यांना बजावली होती. त्यामुळे पक्षाच्या निर्णयावर टीका करून सिक्वेरा यांनी शिस्तभंग केला. पक्षाच्या निर्णयाशी सहमत नसल्यास आपली नापसंती कळविण्यासाठी पक्षात व्यासपीठ आहे. थेट माध्यमांकडे जाण्याची गरज नव्हती, असे कुतिन्हो म्हणाल्या. पक्षविरोधी कारवायांसाठी आतापर्यंत सिक्वेरा यांच्यासह वालंका आलेमाव आणि सुभाष फळदेसाई, या तिघांना निलंबित केले आहे. ज्योकिम आलेमाव, फ्रान्सिससार्दिन, रवी नाईक यांच्यासह इतर काहीजणांना नोटिसा बजावल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.