शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी, पालक धास्तावले

By admin | Updated: April 30, 2016 02:37 IST

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर

पणजी : सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिलेल्या आदेशात वैद्यकीय तसेच दंत महाविद्यालय एमबीबीएस, बीडीएस तसेच पदव्युत्तर प्रवेशासाठी राष्ट्रीय स्तरावरील एनईईट (नीट) परीक्षा बंधनकारक असल्याचे शिक्कामोर्तब केल्याने राज्यातील विद्यार्थी आणि पालक धास्तावले आहेत. गोमेकॉ व दंत महाविद्यालय प्रवेशासाठी जीसीईटी परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र, ऐनवळी राष्ट्रीय स्तरावरील एनईईटी परीक्षा लादण्यात आल्याने विद्यार्थी गोंधळून गेले आहेत. यामुळे शैक्षणिक वर्ष फुकट जाण्याची भीती निर्माण झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही नीट परीक्षा यंदा नकोच, अशी भूमिका घेत येत्या सोमवारी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन याचिका सादर करण्याचे पाऊल उचलले आहे. अ‍ॅडव्होकेट जनरल आत्माराम नाडकर्णी यांना विचारले असता ते म्हणाले की, या निवाड्यावर फेरआढाव्यासाठी सर्वोच्च न्यायालयात पुनर्विलोकन अर्ज दाखल करण्याची सूचना सरकारकडून आलेली आहे आणि सोमवारी याचिका सादर करणार आहोत. येत्या १0 व ११ मे रोजी जीसीईटी परीक्षा होणार असून परीक्षा तोंडावर असताना न्यायालयाचा हा आदेश आला त्यामुळे राज्यात खळबळ उडाली. दरम्यान, मडगावात दामोदर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर तेथे दौऱ्यावर असता भेट घेतली आणि ‘नीट’च्या बाबतीत सरकारने हस्तक्षेप करावा, अशी मागणी केली. (प्रतिनिधी)