शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
3
Ambernath Crime: बॉससोबत प्रेमसंबंध आणि ब्रेकअप, भेटायला गेलेल्या सिमरन पाटीलचा हॉटेलमध्ये मिळाला मृतदेह, नेत्याच्या नावावर रुमची बुकिंग
4
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
5
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
6
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
7
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
8
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
9
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
10
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
11
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
12
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
13
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
14
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
15
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
16
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
17
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
18
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
19
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
20
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विद्यार्थी तणावाखालीच

By admin | Updated: November 26, 2015 01:37 IST

पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही समांतर चित्रपट महोत्सव घेतला. पोलीस

पणजी : एफटीआयआयच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी सलग दुसऱ्या दिवशीही समांतर चित्रपट महोत्सव घेतला. पोलीस बंदोबस्तात झालेल्या या चित्रपट महोत्सवास ज्येष्ठ दिग्दर्शक सईद मिर्झा, तसेच इफ्फीतील काही प्रतिनिधींनीही आवर्जून उपस्थिती लावली. समांतर चित्रपट महोत्सवासाठी पुढाकार घेतलेला एफटीआयआयचा माजी विद्यार्थी प्रतीक वत्स ‘लोकमत’शी बोलताना म्हणाला की, आम्ही इफ्फीत तसेच आजूबाजूला वावरतोय; परंतु पोलीस कधी हात टाकतील याचा नेम नाही. भीतीच्या वातावरणाखालीच वावरावे लागत आहे. शहरात जमावबंदीसाठी १४४ कलम लागू केलेली असल्याने सर्वांनीच नाराजी व्यक्त केली आहे. समांतर चित्रपट महोत्सवाला चांगला प्रतिसाद मिळाल्याचा दावा करताना प्रतीक म्हणाला की, यामुळे विद्यार्थ्यांनाही स्फूर्ती मिळाली. संस्थेत दुसऱ्या आणि तिसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांनी हे चित्रपट तयार केले आहेत. इफ्फीत आमचे चित्रपट डावलले असली तरी लोकांना ते हवे आहेत. गेली दहा वर्षे मी इफ्फीत येतोय, परंतु इतका वाईट अनुभव कधीच आला नाही. चित्रपट तयार करणे किंवा चित्रपट महोत्सवांमध्ये सहभागी होणे हा आमच्या अभ्यासक्रमाचा भाग आहे; परंतु या गोष्टींपासून आम्हाला डावलण्यात आले. प्रतीक याने दिलेल्या माहितीनुसार एफटीआयआयचे १५ आजी, माजी विद्यार्थी सध्या गोव्यात आहेत. समांतर चित्रपट महोत्सवानंतर आता परतणार काय, असे विचारले असता तसे काही ठरलेले नाही. इफ्फीत पत्रके वाटून आम्ही आमचे म्हणणे सिनेसृष्टीशी संबंधित लोकांपर्यंत पोचवणार आहोत, असे त्याने सांगितले. येथील इन्स्टिट्यूट पिएदाद सभागृहात बुधवारी या चित्रपट महोत्सवात विद्यार्थ्यांनी तयार केलेले दहा चित्रपट दाखवण्यात आले. अनुचित घटना घडू नये यासाठी संस्थेच्या सभागृहाच्या आवारात दुसऱ्या दिवशीही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (प्रतिनिधी)