शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये होर्मुझ सामुद्रधुनीचा तिढा, इस्लामाबादमध्ये पहिली बैठक संपली, ४ तास चालली चर्चा
2
आशा भोसले यांना नेमकं काय झालं, आता प्रकृती कशी आहे? नात जनाई भोसलेने दिली माहिती
3
"आप आए बहार आयी..." शतकानंतर Sanju Samson ने शेअर केली ‘लकी चार्म’संदर्भातील गोष्ट
4
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
5
संजू सॅमसनचं नाबाद शतक; जेमी ओव्हरटनचा 'चौकार'! DC ला ऑलआउट करत CSK नं फोडला विजयाचा नारळ
6
Nagpur: वय वर्षे ११, बालिका निघाली बिहारकडे; प्रधान आरक्षक स्नेहल यांना दिसली आणि...
7
Gurjapneet Singh चं स्वप्नवत पदार्पण; पहिल्याच चेंडूवर विकेट! CSK साठी सरफराज खान झाला 'जॉन्टी' (VIDEO)
8
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
9
LPG Crisis: सरकारी दावा फोल, नागपुरात सिलेंडरचा ‘दुष्काळ’च! ४० दिवसांच्या प्रतीक्षेत ग्राहकांचे हाल
10
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
11
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
12
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
13
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
14
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
15
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
16
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
17
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
18
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
19
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
20
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
Daily Top 2Weekly Top 5

मलेरिया, डेंग्यूचे राज्यभर थैमान

By admin | Updated: July 9, 2015 01:09 IST

पणजी : राज्यात जून महिन्यात मलेरियाचे १८८, तर डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळले आहेत. पणजी, मडगाव, कांदोळी येथील भागात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे

पणजी : राज्यात जून महिन्यात मलेरियाचे १८८, तर डेंग्यूचे ७३ रुग्ण आढळले आहेत. पणजी, मडगाव, कांदोळी येथील भागात मलेरियाच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आहे. तसेच वाळपई, कुडतरी, शिरोडा इत्यादी ग्रामीण क्षेत्रातही डेंग्यूच्या रुग्णांचे प्रमाण अधिक आढळले आहे. मात्र, गतवर्षी जून महिन्यात आढळलेल्या रुग्णांपेक्षा यंदा हे प्रमाण बरेचकमी आहे. उत्तर गोव्यात एकाच परिसरात मोठ्या प्रमाणात मलेरिया किंवा डेंग्यूचे रुग्ण आढळले नाहीत. पणजी, कांदोळी, मडगाव, वास्को शहरात विविध परिसरात मिळून आकडेवारी दिली आहे. राज्यातील ग्रामीण भागात डेंग्यू वाढत आहे. याचे प्रमुख कारण साठवण्यात येणारे पाणी असू शकते. पावसाचे पाणी साठून राहात असल्यामुळे मलेरियाच्या डासांच्या अळ्यांची मोठ्या प्रमाणात पैदास होऊ शकते. यासाठी नागरिकांनी दक्ष राहून आपल्या आसपासचा परिसर स्वच्छ ठेवावा, असे आवाहन आरोग्य खात्याचे अधिकारी डॉ. चंद्रकांत परब यांनी केले आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत यंदा मलेरिया आणि डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. २0१३ साली जून महिन्यात १५३0 मलेरियाचे रुग्ण आढळले होते, तर २0१४ साली ८२४ रुग्ण आढळले. २0१३ साली डेंग्यूचे १९८, तर २0१४ साली १६८ डेंग्यू रुग्ण आढळले आहेत. दरवेळी पावसाळ्यात मलेरिया रुग्णांची संख्या वाढू लागते. ज्या ठिकाणी बांधकाम क्षेत्रे आहेत, तिथे मजुरांमध्ये मलेरियाचे प्रमाण जास्त आहे. यामुळे परराज्यातून येणाऱ्या मजुरांना आरोग्य कार्ड करणे सक्तीचे करण्यात आले आहे. मलेरिया आणि डेंग्यूचे रुग्ण शहर आणि ग्रामीण भागात वेगवेगळ्या प्रमाणात आढळले आहेत. काही भागात वीसपेक्षा जास्त संख्येने रुग्ण आढळले आहेत, तर काही भागात एक-दोन असे रुग्ण आढळले आहेत. प्रत्येक नागरिकाने आपला परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी घेतली पाहिजे, तसेच मलेरिया, डेंग्यूसारखी लक्षणे दिसताच योग्य वैद्यकीय सल्ला घेणे आवश्यक असल्याचे डॉ. परब म्हणाले.(प्रतिनिधी)