शहरं
Join us  
Trending Stories
1
वाटाघाटी फिसकटल्या, आता पुन्हा युद्ध... ट्रम्प यांच्या आदेशाने इराणवर परत सुरु होणार हल्ले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांची होर्मुजच्या सामुद्रधुनीवर बंदी घालण्याची धमकी, Crude Oil च्या किमतीचा भडका, किती झाली किंमत?
3
आजचे राशीभविष्य, १३ एप्रिल २०२६: नकारात्मकता दूर ठेवा, लाभ होईल, मान-सन्मान वाढेल!
4
मतदारयादीच्या 'फिल्टर'चा बंगालच्या सत्तेवर परिणाम, ९१ लाख नावे बाद, ६५ ते ७० मतदारसंघांत ठरावीक केंद्रे ठरणार निर्णायक, वगळलेल्या नावांचा प्रभाव येथेच
5
महिला आरक्षणासाठी पंतप्रधानांनी सर्वच पक्षांकडून मागितले समर्थन, पक्षांच्या गटनेत्यांना पत्र लिहून आवाहन
6
पश्चिम बंगालमधील मतदारयाद्यांबाबत सुप्रीम कोर्टात आज निकाल
7
विदर्भात पारा ५ अंशांनी वाढला; अकोला जिल्हा सर्वाधिक ‘हॉट’, थंड हवेचे ठिकाण बुलढाणाही तापले; ८ दिवस राहणार तडाखा
8
MI vs RCB : विकेट गमावल्यावर Virat Kohli ला राग अनावर! हेल्मेट-ग्लोव्हज फेकल्याचा व्हिडिओ व्हायरल
9
विशेष लेख: पाकिस्तानच्या भूमिकेवरून एवढा गोंधळ, गदारोळ का?
10
‘पीएच.डी गाइड’च्या छळाला कंटाळून पुण्यात विद्यार्थिनीनं संपवलं जीवन, मार्गदर्शक शास्त्रज्ञ अटकेत; चिठ्ठीतून गंभीर आरोप
11
चीनने पाकव्याप्त काश्मीर-अफगाण सीमेजवळ स्थापन केला नवीन विभाग
12
‘ईशान्येला देशापासून वेगळे करण्याचा डाव’, पंतप्रधान मोदींचा गंभीर आरोप
13
अमरनाथ यात्रा ३ जुलैला सुरू होणार; १५ एप्रिलपासून नोंदणी
14
Iran War: इराणच्या युद्धात महासत्ता अमेरिकेचा ‘सेल्फ गोल’
15
आता स्ट्रेट ऑफ होर्मुझवर असणार अमेरिकेची करडी नजर; डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
16
रोहितनं मैदान सोडलं तिथंच मॅच फिरली; वानखेडेवर RCB पुन्हा ठरली 'धुरंधर'! MI ची पराभवाची हॅटट्रिक
17
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
18
एनसीबी’ने नागपुरात पकडला २० कोटींचा गांजा, ओडिशातून येत होती खेप
19
Rohit Sharma retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना हिटमॅन रोहित शर्मानं का सोडलं मैदान?
20
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

तारांकित हॉटेलांना अतिरिक्त २0 टक्के एफएआर मंजूर

By admin | Updated: July 3, 2015 01:28 IST

पणजी : चार व पंचतारांकित हॉटेलांना २0 टक्के अतिरिक्त एफएआर (चटई निर्देशांक) बहाल करणारी अधिसूचना नगरनियोजन खात्याने जारी केली आहे.

पणजी : चार व पंचतारांकित हॉटेलांना २0 टक्के अतिरिक्त एफएआर (चटई निर्देशांक) बहाल करणारी अधिसूचना नगरनियोजन खात्याने जारी केली आहे. गोवा भू विकास व बांधकाम कायदा २00८च्या नियमात दुरुस्ती करण्यात आली असून हॉटेलांना यामुळे अतिरिक्त बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘गोवा बचाव अभियान’ने याला जोरदार हरकत घेताना, सरकार भांडवलदारांच्या दबावाखाली वावरत असल्याचा आरोप केला आहे.नगरनियोजन खात्याच्या सचिवांच्या अध्यक्षतेखालील पाच जणांची समिती वाढीव एफएआरसाठी अर्ज आल्यानंतर त्याबाबत निर्णय घेऊन आवश्यक ती शिफारस सरकारला करील. या समितीवर हॉटेलमालकांचे प्रतिनिधी म्हणून टूर अ‍ॅण्ड ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष, पर्यटन खात्याचे संचालक, सरकारनियुक्त आर्किटेक्ट किंवा अभियंता हे सदस्य असतील, तर मुख्य नगर नियोजक सदस्य सचिव आहेत.इमारतीची उंची, किमान सेटबॅक याबाबत निर्णय घेण्याचा अधिकार सरकारने स्वत:कडे ठेवला आहे. स्थानिक पंचायत किंवा पालिकेकडून देण्यात आलेला बांधकाम परवाना, भू रूपांतर सनद, हॉटेलची श्रेणी स्पष्ट करणारे केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचे पत्र, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, घन कचरा व्यवस्थापन याबाबत केलेली व्यवस्था, पार्किंग आदी बाबी स्पष्ट कराव्या लागणार आहेत.उंचीच्या बाबतीत एक अतिरिक्त मजला येईल, इतकीच शिथिलता दिली जाणार असून एकूण उंची २४ मीटरपेक्षा जास्त होता कामा नये. अस्तित्वात असलेल्या इमारतीच्या बाबतीत अतिरिक्त ५ टक्के एफएआरचा विचार शक्य असल्याचेही अधिसूचनेत म्हटले आहे. हॉटेलकडे जाणारा रस्ता २0१0च्या नियमावलीत निर्दिष्टित रुंदीइतका असायला हवा. १५ मीटरपेक्षा जास्त उंची असलेल्या इमारतींना अग्निशामक दलाची परवानगी बंधनकारक आहे.शैक्षणिक संस्थांनाही २0 टक्के अतिरिक्त एफएआरची व्यवस्था करण्यात आली आहे. (प्रतिनिधी)