शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

दहावीचा निकाल ८५.१५ टक्के

By admin | Updated: May 24, 2015 01:18 IST

पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत

पणजी : शालान्त मंडळाने घेतलेल्या दहावी परीक्षेचा निकाल ८५.१५ टक्के लागला असून यशाची परंपरा कायम राखताना मुलींनी उत्तीर्ण टक्केवारीत आणि सर्वाधिक गुण घेण्याच्या बाबतीत मुलांवर मात केली. एकूण ७६ विद्यालयांचा ९५ ते १०० टक्के निकाल लागला असून अशी कामगिरी ३७ विद्यालयांनी सलग दोन वर्षे केली आहेत.एकूण १९५८२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. त्यातील १६७७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मुलांची उत्तीर्ण होण्याची टक्केवारी ८४.३० इतकी आहे, ८९.१५ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. एकूण २४ केंद्रांत परीक्षा झाली होती. त्यात सर्वाधिक निकाल म्हापसा केंद्रात ९०.८३ टक्के, तर सर्वांत कमी निकाल ७२.६० टक्के लागला. क्रीडा गुणांचा लाभ यंदा ७६२१ विद्यार्थ्यांना झाला. त्यातील ५०७ विद्यार्थी केवळ क्रीडा गुणांमुळे उत्तीर्ण होऊ शकले. म्हणजेच २.५९ टक्के विद्यार्थी क्रीडागुणांमुळे उत्तीर्ण झाले.काही कठीण वाटणारे विषय सोडून त्याऐवजी पूर्व व्यावसायिक विभागातील सोपे विषय घेऊन परीक्षा देण्याची सुविधा शालान्त मंडळाने दिली आहे. अशा एकूण २८० विद्यार्थ्यांपैकी २२० विद्यार्थी उत्तीर्ण झाले.विशेष मुलांच्या गटात १९९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातील ५२ जण विशेष शाळेतील, तर १४७ जण नियमित विद्यालयातील होते. एकूण ७६ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. (प्रतिनिधी)