शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांनी बारामती उभी केली नसती, तर महाराष्ट्रात..."; संजय राऊतांचे रोखठोक विधान
2
'होर्मुझ'वरून तणाव वाढला! अमेरिका आजपासून करणार इराणची नाकेबंदी, सेंट्रल कमांडचा इशारा
3
UPI अ‍ॅप्समध्येही असतं का 'Undo' बटण, चुकीच्या UPI ID वर पैसे गेल्यास कसे मिळवाल परत?
4
प्रशासनाचा प्रस्ताव धुडकारला, वाहनांना लावली आग; नोएडात ३ दिवसांपासून रस्त्यावर का उतरले कर्मचारी?
5
Top Marathi News LIVE Updates: कल्याण- अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ८ जण ठार झाल्याची माहिती
6
पिंपरी: धक्कादायक! प्राध्यापकाच्या छळामुळे विद्यार्थिनीने उचललं टोकाचं पाऊल, एकाला अटक
7
Aditya Dhar Net Worth: ‘धुरंधर’च्या दिग्दर्शकाकडे किती आहे संपत्ती? मुंबई ते हिमाचलपर्यंत आहे प्रॉपर्टी
8
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; खरेदी करणार असाल तर पाहा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K Gold चे नवे दर
9
IPL 2026 Points Table : गत चॅम्पियन RCB टॉप ३ मध्ये; पाचवेळच्या विजेत्या MI अन् CSK ची अवस्था बिकट
10
CET Exam: 'सीईटी'ची केंद्रे दूर; विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल, पालकांमध्ये तीव्र नाराजी
11
धर्मांतर प्रयत्नप्रकरणी नाशिकमधील 'त्या' बहुराष्ट्रीय कंपनीतील आरोपी निलंबित
12
गोकूळमध्ये गैरप्रकार? शिवाजीराव पाटलांच्या आरोपांवर हसन मुश्रीफ यांचं स्पष्टीकरण
13
ABMCM: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या बचावासाठी सरसावले चित्रपट व्यावसायिक
14
Asha Bhosle: सूरसम्राज्ञी आशा भोसलेंचा पहिला नमस्कार अंबाबाईला.. दुसरा सरस्वतीला
15
Kolhapur: 'केडीसीसी'ची खुर्ची एवढी वजनदार, की कर्मचाऱ्यांना दहा वर्षे सोडवेना
16
वेतनवाढीच्या मागणीवरून कामगार आक्रमक; वाहनांची तोडफोड आणि दगडफेक, नोएडातील घटना!
17
ट्रम्प यांच्या धमकीनंतर शेअर बाजारात भूकंप; सेन्सेक्स १४०० अंकांनी आपटला; निफ्टी २४ हजारांच्या खाली
18
सिंधुदुर्ग जिल्ह्यात ग्रामपंचायतीच्या १००हून अधिक रिक्त जागांसाठी पोटनिवडणुकीची नोटीस जारी
19
SBI Home Loan: स्टेट बँकेतून ५० लाख रुपयांचं होम लोन घ्यायचंय; पाहा किती असावी लागेल सॅलरी?
20
IPL 2026: भर मैदानात टिम डेव्हिडची ‘दादागिरी’! पंचांच्या हातून चेंडू हिसकावला अन्...; पाहा नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

पहिल्यांदाच अडला लोलयेतील शिगमा!

By admin | Updated: March 3, 2015 01:30 IST

शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या अखंडपणे चाललेला लोलये गावातील पारंपरिक शिगमा यंदा खंडित झाल्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे.

वासुदेव पागी ल्ल पणजी शेकडो वर्षे पिढ्यान्पिढ्या अखंडपणे चाललेला लोलये गावातील पारंपरिक शिगमा यंदा खंडित झाल्यामुळे लोकांच्या उत्साहावर विरजण पडले आहे. पोर्तुगीज राजवटीतही शिगमोत्सवात खंड पडला नव्हता. मात्र, प्रमुख मानकऱ्यांच्या कौटुंबिक अडचणीमुळे यंदाचा शिगमा अडला आहे. यामुळे दीडशे वर्षांची परंपरा प्रथमच खंडित झाली आहे. या गावातील एकूण ६ वाड्यांवरील मिळून एकूण ६ शिगम्याची पथके आहेत, त्यांना शिगम्याचे मेळ असे म्हणतात. या मेळांपैकी ‘वडील’ म्हणजे प्रमुख मेळ मानला जाणारा पोळे येथील मेळ यंदा काढला गेला नाही. मेळ काढणे यालाच ‘मेळ खेळवणे’ असेही म्हटले जाते. येथील दैवत ‘मूळविरा’च्या नावाने काढण्यात येणाऱ्या या मेळाला ‘विरामेळ’ असेही म्हणतात. हा मेळ काढला नाही तर बाकीचे मेळही काढले जात नाहीत, अशी या ठिकाणी प्रथा आहे. त्यामुळे इतर मेळही काढले गेले नाहीत. मेळ पोळे (विरामेळ), मेळ तानशी, मेळ पेडे, मेळ शेळी, मेळ कोळकण आणि मेळ तामने असे हे सहा मेळ आहेत. या गावचा प्रमुख मेळ म्हणजे पोळे मेळ न काढण्याचे कारणही आहे. हा मेळ येथील गावकर, भंडारी, पागी आणि गोसावी समाजातील लोकांच्या एकतेचे प्रतीक मानला जात असून या चारही समाजातील लोकांनी त्याची जबाबदारी घ्यायची असते; परंतु मेळ बाहेर काढण्यासाठी मुख्य विधीची जबाबदारी ही गावकर समाजाची असते. येथील मूळवीर देवाचे प्रतीक मानले जाणारे साहित्य ज्याला ‘पिल्लकचा’ असे म्हटले जाते, ते धरण्याचा मान या कुटुंबीयांना असतो. मोरपिसांनी सुशोभित केलेल्या या पिल्लकच्यात मूळवीर देवाची जटा ठेवली जाते, अशी येथील लोकांची श्रद्धा आहे. (पान २ वर)