शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
2
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
3
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
4
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
5
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
6
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
7
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
8
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
9
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
10
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
11
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
12
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
13
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
14
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
15
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
16
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
17
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
18
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
19
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
20
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील मडगाव पालिका क्षेत्रात उघड्यावर कचरा टाकणा-यांवर आता सेन्टिनलची करडी नजर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2019 20:07 IST

गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणा-या मडगाव शहरात आता उघड्यावर कचरा टाकणा-यांवर सेन्टिलनची कडक नजर राहणार आहे.

मडगाव: गोव्याची आर्थिक राजधानी म्हणून गणल्या जाणा-या मडगाव शहरात आता उघड्यावर कचरा टाकणा-यांवर सेन्टिलनची कडक नजर राहणार आहे. आज पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक तसेच प्रभारी नगराध्यक्ष टिटो कादरेज यांनी कचरा सेन्टीनल योजना जारी केली. सद्या पालिका क्षेत्रातील सोनसोडो कचरा यार्डात वर्गीकरण न केलेल्या कचरा घेतला जात नसल्याने तसेच शहरात मिळेल तेथे कचरा टाकला जात असल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात मोठ्या प्रमाणात कच-याचा ढीग साचत आहे. उघड्यावर कचरा टाकणा-यांवर आता सेन्टीनल नजर ठेवणार आहेत.वॉटसअपच्या माध्यमातून 8390208406 या क्रमाकांवरून कचरा टाकणा-याचा व्हिडीओ वा त्याचे छायाचित्र अथवा वाहन क्रमांक टिपून पाठवावा. सेन्टीनलने आपले नाव, वय, तारीख, पत्ता तसेच कचरा टाकला जात आहे तेथील पत्ता व वेळेची नोंद द्यावी असेही सुचविण्यात आले आहे. सेन्टीनलची माहिती गोपनीय ठेवली जाईल. त्यांना एका प्रकरणात एक हजार रुपये दिले जाईल तर कचरा टाकणा-यांना पाच हजार रुपये दंड ठोठावला जाईल अशी माहिती पालिका मुख्याधिकारी सिद्धिविनायक नाईक यांनी दिली.मडगाव पालिकेने कचरा प्रश्न गांभीर्यतेने घेतला आहे. मंगळवारी पालिकेचे सफाई विभाग निरीक्षकांनी कचरा टाकणा-यांना पकडून त्यांना समज दिली आहे. उघड्यावर कचरा टाकणा-यांची गय केली जाणार नाही. शेजारच्या पंचायत क्षेत्रातील लोक कचरा टाकत आहेत. हॉस्पिसियोच्या आवारात कचरा साचला असल्याची माहिती पत्रकारांनी दिल्यानंतर त्याची गंभीर दखल घेतली गेली असल्याचेही नाईक म्हणाले. प्रभारी नगराध्यक्ष टिटो कादरेज यांनी या सेन्टीनलची माहिती पत्रकारांना देताना लोकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले.