शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
2
Video : हॉट एअर बलूनमध्ये लागली आग, २१ जण जमिनीवर कोसळले! ८ जणांचा जागीच मृत्यू
3
IND vs ENG : बुमराह एकटा नडला! फिल्डिंगवेळी गडबड घोटाळा; ओली पोपच्या सेंच्युरीसह दुसरा दिवस इंग्लंडचा
4
इराणवर मोठा हल्ला; इस्रायलने पुन्हा खामेनेईंचे कमांडर मारले; अणुशास्त्रज्ञाचाही मृत्यू
5
बंकर बस्टर बॉम्ब...! अमेरिकेची एकाचवेळी ६ बी-२ बॉम्बर विमाने झेपावली; इराणमध्ये काहीतरी मोठे घडणार...
6
बुमराहचा मोठा पराक्रम! इंग्लंडच्या मैदानात पाकच्या वसीम अक्रमच्या विक्रमाला लावला सुरुंग
7
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
8
मोठा खुलासा! राजाचा मृतदेह घरी आणण्यापासून ते अंत्यविधीपर्यंत प्रत्येक क्षणाची खबर सोनमला देत होता राज कुशवाहा अन्... 
9
१४ वर्षांनी लहान असणाऱ्या तरुणाच्या प्रेमात पडली ४५ वर्षांची महिला, पतीला असं संपवलं की कुणाला संशयही आला नाही!
10
"पिक्चर अभी बाकी है…!"; 2029 मधील आपल्या भूमिकेबद्दल नेमकं काय म्हणाले नितिन गडकरी?
11
Superb! पंतच्या खेळीवरील गावसकरांची कमेंट चर्चेत; आधी 'स्टुपिड' म्हणत काढली होती 'अक्कल' (VIDEO)
12
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
13
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
14
गोदाम फोडणाऱ्या दोघांना अटक; अडीच लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त, लातूर स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
15
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
16
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
17
कुपवाडजवळ पावणेबारा लाखांची दारू पकडली, आटपाडीच्या दोघांना अटक, स्थानिक गुन्हे अन्वेषणची कारवाई
18
रिलायन्स दरोड्यातील प्रिन्सकुमारला अटक; डेहराडून कारागृहातून ताबा, साथीदारांना दुचाकी पुरवली
19
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
20
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ

सुरक्षा रक्षक भरतीत स्थलांतरितांना संधी!

By admin | Updated: July 2, 2015 01:35 IST

पणजी : मानव संसाधन विकास महामंडळाने सुरक्षा रक्षक भरतीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता २६0 उमेदवारांपैकी केवळ १00 सुरक्षा रक्षकांनाच शारीरिक चाचणीसाठी

पणजी : मानव संसाधन विकास महामंडळाने सुरक्षा रक्षक भरतीसाठी प्रक्रिया सुरू केल्यानंतर आता २६0 उमेदवारांपैकी केवळ १00 सुरक्षा रक्षकांनाच शारीरिक चाचणीसाठी उपस्थित राहण्याविषयी पत्र पाठविले आहे. आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांना वगळून महामंडळ बिगर गोमंतकीयांनाच जास्त पदे देऊ पाहत असल्याचा आरोप कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी बुधवारी केला. कांपाल येथे सकाळी सुरक्षा रक्षकांनी एकत्रित येऊन महामंडळाच्या या प्रकाराचा निषेध केला. या वेळी कामगार नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले की, आंदोलनकर्त्या सुरक्षा रक्षकांना नोकरी भरती प्रक्रियेत फसविण्यात येत आहे. ४२ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या सुरक्षा रक्षकांना डावलले आहे. सरकारने आंदोलन केलेल्या सर्व सुरक्षा रक्षकांना एप्रिलपर्यंत नोकरीत सामावून घेण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, सध्या सुरू असलेल्या नोकर भरती प्रक्रियेत विविध कारणे देऊन सुरक्षा रक्षकांना वगळण्यात येत आहे. पाचशे सुरक्षा रक्षकांच्या निुयक्तीसाठी जाहिरात काढली होती. त्यात कंत्राटी मजूर भरती संस्थेचे २६0 सुरक्षा रक्षकांनी अर्ज केले होते. यातील केवळ १00 सुरक्षा रक्षकांना शारीरिक चाचणी परीक्षेसाठी बोलाविले आहे.याबाबत महामंडळाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला असता, पाचशे सुरक्षा रक्षकांच्या नियुक्तीसाठी एक हजार तीन अर्ज सादर झाले होते. त्यातील नियमात बसणाऱ्या उमेदवारांना परीक्षेसाठी बोलाविल्याचे अधिकारी कुलासो यांनी सांगितले. सरकार आश्वासनांवरच ठाम राहिले नसून सुरक्षा रक्षकांच्या नोकरीशी खेळ मांडण्यात येत आहे. सहा महिने चारशेहून अधिक सुरक्षा रक्षक बेरोजगार असून सरकारच्या आश्वासनामुळे व विरोधी पक्षातील आमदारांच्या मध्यस्थीमुळे आंदोलन मागे घेतले होते. आता प्रत्यक्षात सुरक्षा रक्षकांच्या नोकरीबाबत फसवणूक करण्यात येत असून बिगर गोमंतकीय कामगारांना या नोकरीवर रुजू करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा आरोप केरकर यांनी केला. (प्रतिनिधी)