शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छता कंत्राटात घोटाळा

By admin | Updated: May 17, 2015 00:58 IST

पणजी : राज्य सरकारने समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप अ‍ॅड. आयरिश रॉड्रि

पणजी : राज्य सरकारने समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी दिलेल्या कंत्राटात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा होत असल्याचा आरोप अ‍ॅड. आयरिश रॉड्रिग्स यांनी येथे शनिवारी पत्रकार परिषदेत केला. माहिती हक्क कायद्यांतर्गत मिळालेल्या माहितीनुसार, घोटाळ्यात सरकारी अधिकाऱ्यांचा सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याचे रॉड्रिग्स यांनी स्पष्ट केले आहे.समुद्रकिनारे स्वच्छता घोटाळ्याप्रकरणी पर्यटनमंत्री दिलीप परुळेकर, पर्यटन खात्याचे संचालक अमेय अभ्यंकर, पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखील देसाई, राम क्लिनर्स प्रा. लि. आणि भूमिका क्लिन टेक प्रा. लि. या दोन्ही कंपनीचे मालक मनीष मोहता आणि अवधूूत पर्रीकर यांचा समावेश असल्याने त्यांच्या विरोधात एफआयआर नोंद करा, अशी मागणी रॉड्रिग्स यांनी केली आहे.समुद्रकिनाऱ्यांच्या स्वच्छतेसाठी पूर्वी १ कोटी ८० लाख रुपये एवढा खर्च यायचा तो खर्च आता १४ कोटी ५६ लाख रुपयांपर्यंत पोहचला आहे. शासकीय कामकाजात अवधूत पर्रीकर यांच्या नावाची कुठेच नोंद नसताना ते सरकारी अधिकाऱ्यांच्या आणि समुद्रकिनारे स्वच्छता बैठकीत सहभागी होतात, अशी माहिती समोर आल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले. गतवर्षी सप्टेंबर महिन्यात उत्तर गोव्याचे कंत्राट भूमिका क्लिन टेकसर्र्व्हिस प्रा. लि. या कंपनीला रु. ७ कोटी ५१ लाख ४० हजार ९९९ रुपये या किमतीत तर दक्षिण गोव्यासाठी रु. ७ कोटी ४ लाख ८७ हजार ९९९ रुपये किमतीचे वार्षिक कंत्राट राम क्लिनर्स अ‍ॅण्ड डेव्हलपर प्रा. लि. यांना देण्यात आले आहे. या दोन्ही कंपनीचे मालक मनीष मोहता आहेत.या कंपन्यांकडून समुद्रकिनाऱ्यांकडे पूर्णत: दुर्लक्ष करण्यात झाले असून समुद्रकिनाऱ्यानजीक कचरा जाळण्यात येत आहे. त्याचप्रमाणे खड्डे खणून त्यात कचरा टाकून रेती टाकण्याचे प्रकार घडत आहेत. मिरामार समुद्रकिनाराही या समस्येत सापडला आहे. कंत्राटदाराला साळगाव येथे कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी दिलेल्या जमिनीची स्थिती सोनसडोसारखी झाल्याचे रॉड्रिग्स यांनी सांगितले.समुद्रकिनाऱ्यावरील जैविक संपत्ती नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी मनीष मोहता यांच्यावर कारवाई केली जावी. केंद्र आणि राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नियम न जुमानता सरकारी जमिनीवर कचरा जाळल्याप्रकरणी आणि खोदकाम केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी रॉड्रिग्स यांनी केली. मनीष मोहता यांचे कंत्राट त्वरित रद्द करून त्यांची सुरक्षा ठेव रक्कम काढून घ्यावी, असे त्यांनी या वेळी सांगितले. (प्रतिनिधी)