शहरं
Join us  
Trending Stories
1
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
2
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
3
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
4
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
5
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
6
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
7
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
8
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
9
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
10
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
11
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
12
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
13
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
14
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
15
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
16
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
17
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
18
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
19
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
20
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

सव्वादोन लाखांचा गांजा फोंड्यात जप्त

By admin | Updated: September 28, 2016 01:58 IST

फोंडा : फोंडा पोलिसांनी सोमवारी रात्री (दि. २६) केलेल्या धडक कारवाईत दोन परप्रांतीयांकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला.

फोंडा : फोंडा पोलिसांनी सोमवारी रात्री (दि. २६) केलेल्या धडक कारवाईत दोन परप्रांतीयांकडून सुमारे सव्वादोन लाख रुपये किमतीचा पाच किलो गांजा जप्त केला. या कारवाईत दोन्ही संशयितांना अटक करण्यात आली. रात्री आठ वाजण्याच्या सुमारास कुर्टी-फोंडा येथील गोवा डेअरीच्या परिसरात एक युवक गांजा विकायला आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून समीर बाबासाब मुल्ला (२३, मूळ रा. विक्रमनगर-कोल्हापूर, सध्या झिंगडीमळ-कुर्टी) याला ताब्यात घेतले. त्याची झडती घेतली असता, त्याच्याकडे ३ किलो १९४ ग्रॅम गांजा सापडला. फोंडा पोलिसांनी संशयितास अटक केली असून उपनिरीक्षक नितीन हळर्णकर पुढील तपास करीत आहेत. दुसऱ्या घटनेत बेतोडा जंक्शनजवळ प्रभाकर जयंती (वय ३४, मूळ ओडिशा) या युवकाला फोंडा पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याकडे १.४५ किलो गांजा आढळून आला. ही कारवाई रात्री १०.०५ वाजण्याच्या सुमारास करण्यात आली. या प्रकरणी उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर यांनी गुन्हा नोंदवला असून निरीक्षक सुदेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. (प्रतिनिधी)