शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय संगीतातील चिरतरुण स्वर हरपला! 'महाराष्ट्र भूषण' ज्येष्ठ गायिका आशा भोसले काळाच्या पडद्याआड
2
“मंगेशकर कुटुंबातील ईश्वरीय आवाज लाभलेला तारा निखळला”; CM फडणवीसांकडून आशाताईंना श्रद्धांजली
3
US-इराणमधील चर्चा फिस्कटली, पुन्हा युद्धाचे ढग; भारत अलर्ट मोडवर, 'स्पेशल ऑपरेशन' लॉन्च
4
“चंदेरी दुनियेच्या सफरीचा आनंद देणारा दैवी आवाज शांत झाला”; DCM शिंदेंकडून आशाताईंना आदरांजली
5
Asha Bhosale Songs: आशा भोसलेंची 'ही' गाणी प्रचंड गाजली! आजही ऐकली की चेहऱ्यावर हसू अन् डोळ्यांत पाणी येतं
6
आशा ताईंना सर्वात जास्त प्रिय होता 'डाळ-भात', स्वतः बनवायच्या 'हे' खास लोणचं; साध्या राहणीमानानंही जिंकली चाहत्यांची मनं
7
२० भाषा अन् १२ हजारांहून अधिक गाणी! 'असा' होता आशा भोसले यांचा संगीत विश्वातील प्रवास
8
"अशा बॉसना देव सुखी ठेवो!"; तरुणीला झाली आंबे खाण्याची इच्छा, थेट घरी पोहोचल्या पेट्या
9
बाप रे! शाळेत घुसल्या हजारो मधमाश्या, परीक्षेचे पेपर सोडवणाऱ्या मुलांवर केला हल्ला; एका चिमुकल्याचा मृत्यू
10
Asha Bhosle: ज्या आवाजाने जग जिंकलं, त्यांच्याच हातच्या चवीने हॉटेल साम्राज्य उभं केलं
11
शांततेचे प्रयत्न अपयशी! इराणसाठी ट्रम्प यांचा खतरनाक 'प्लॅन बी' तयार; भारताच्या तेल पुरवठ्यावरही संकट?
12
Asha Bhosale Death: आशा भोसले यांच्या निधनानंतर मुलाची भावूक प्रतिक्रिया; अंत्यसंस्काराबाबत दिली महत्त्वाची माहिती
13
सावंतवाडीमध्ये मद्यधुंद टेम्पो चालकाची दुचाकीला धडक; चिमुकलीचा जागीच मृत्यू, आई जखमी
14
"इराणने आम्हाला संपवण्याची धमकी दिली, आता स्वतःच...!" शांतता चर्चा फिसकटल्याने नेतन्याहू भडकले
15
शांतता चर्चा फिस्कटल्याने डोनाल्ड ट्रम्प चिडले; आता इराणची खैर नाही, घेराव टाकण्याची दिली धमकी
16
NCB ची मोठी कारवाई! गांजा तस्करी रॅकेटचा पर्दाफाश; २१० किलो गांजा जप्त, चौघांना अटक
17
“आशाजी, लवकरात लवकर बऱ्या व्हा”; पंतप्रधान मोदींकडून तब्येतीची विचारपूस अन् केली प्रार्थना
18
डॉक्टर, मला मृत्यू हवाय..., लिविंग विल हा पर्याय किती उपयुक्त?
19
Lakshya Mishra : Video - हॉस्टेलमध्ये लेकाचा गूढ मृत्यू; खिडकी पाहताच वडील म्हणाले, "माझ्या मुलाची हत्या झालीय"
20
सुविधा देताना रेल्वेचे 'सावत्र' प्रेम!; मध्य-पश्चिम रेल्वेत दुजाभाव होतोय, प्रवाशांची भावना
Daily Top 2Weekly Top 5

सांकवाळ मरिना गोत्यात

By admin | Updated: July 7, 2015 01:53 IST

पणजी : सांकवाळ किनारी भाग जैव वारसा स्थळ जाहीर करण्यासाठी पुरेसे दाखले गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), जैव विविधता मंडळ, तसेच वन,

पणजी : सांकवाळ किनारी भाग जैव वारसा स्थळ जाहीर करण्यासाठी पुरेसे दाखले गोवा किनारपट्टी व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए), जैव विविधता मंडळ, तसेच वन, कृषी आदी खात्याच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या तपासणीत मिळाले असून यामुळे येथे येऊ घातलेला सुमारे १00 कोटींचा मरिना प्रकल्प गोत्यात आला आहे.तपासणीसाठी गेलेल्या पथकातील सर्वच सदस्यांनी हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील असल्याने बांधकामांना परवाने देऊ नये, अशी भूमिका घेतल्याची माहिती प्राप्त झाली आहे. हा भाग जैव वारसा स्थळ म्हणून जाहीर झाल्यानंतर तेथे कोणतेही बांधकाम करता येणार नाही.सांकवाळ व नावशी, बांबोळी मरिना प्रकल्पांना स्थानिकांनी जोरदार विरोध केला होता त्यामुळे निर्णयाचा फेरआढावा घेण्याचे आश्वासन मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी दिले होते. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. खासगी कंपनी आणि मुरगाव पोर्ट ट्रस्टने दोन मरिना सूचविल्या होत्या. त्यात एक सांकवाळ व दुसरा नावशी, बांबोळी येथे उभारण्याच्या हालचाली आहेत.सांकवाळच्या स्थानिक आमदार तथा पर्यावरणमंत्री एलिना साल्ढाना तसेच सांत आंद्रेचे आमदार विष्णू वाघ यांनी मरिना प्रकल्पांना विरोध दर्शविला होता. मरिना आल्यास स्थानिक मच्छीमारांचे उदरनिर्वाहाचे साधन नष्ट होईल, तसेच बोटी मोठ्या प्रमाणात येतील व त्यामुळे प्रदूषणही होईल, अशी भीती व्यक्त केली जात होती.पर्यावरण मंत्रालय तसेच जैव विविधता मंडळाने परवानगी दिली तरच पुढे जावे या अटीवर गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाने या प्रकल्पांना मंजुरी दिली होती. सांकवाळ येथे याच्च हॅवन मरिना व नावशी येथे कार्गवाल मरिना येणार होता.जैव विविधता मंडळाचे सदस्य सचिव नितीन सावंत यांच्याशी संपर्क साधला असता, सांकवाळ किनारपट्टीची सोमवारी सीआरझेड अधिकाऱ्यांबरोबर संयुक्त तपासणी केल्याच्या वृत्तास त्यांनी दुजोरा दिला; परंतु मरिना प्रकल्पाशी या तपासणीचा कोणताही संबंध नसल्याचे सांगितले. या किनारी पट्ट्यात शिपयार्डकडून प्रदूषण होत असल्याचे तसेच तिसऱ्यो, शिनाण्यो व अन्य मत्स्यसंपत्ती धोक्यात आल्याची स्थानिकांची तक्रार होती. त्यामुळे मुरगाव बंदरापासून कुठ्ठाळी पुलापर्यंत किनारी भागाची तपासणी केल्याचे ते म्हणाले. (प्रतिनिधी)