शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

साळगावकर बंधूंची अटकेनंतर सुटका!

By admin | Updated: March 10, 2016 02:03 IST

पणजी : खनिज खाण घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर व अर्जुन साळगावकर यांना विशेष पोलीस पथकाने (एसआयटी) बुधवारी

पणजी : खनिज खाण घोटाळा प्रकरणात उद्योजक समीर साळगावकर व अर्जुन साळगावकर यांना विशेष पोलीस पथकाने (एसआयटी) बुधवारी अटक केली. त्यांच्या अटकपूर्व जामिनावर अद्याप निवाडा झाला नसल्यामुळे अटक करून सुटका करण्याची औपचारिकता एसआयटीने केली. एसआयटीच्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी साळगावकर बंधूंना दोनापावल येथील एसआयटीच्या कार्यालयात बोलविले होते. दोघांनी हजेरीही लावली. काही वेळ चौकशी करून नंतर साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर सायंकाळी दोघांनाही रायबंदर येथील क्राईम ब्रँचच्या कार्यालयात नेण्यात आले. त्यानंतर लवकरच त्यांना मुक्तही करण्यात आले. समीर व अर्जुन यांची प्रत्येकी एक लाख रुपये जामीन आणि एक हमीदार या अटींवर सुटका करण्यात आली. साळगावकर बंधूंनी अटक चुकविण्यासाठी पणजी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केले आहेत. या अर्जांवर अजून निवाडा झाला नसल्यामुळे त्यांना अटक करून ठेवण्यास मज्जाव आहे. त्यामुळे कायदेशीर सोपस्कार पार पाडतत या दोघांना अटक करून मुक्त करण्यात आले आहे. त्यांना अटक करून त्यांची कोठडी मिळविण्यासाठी एसआयटीला न्यायालयाच्या निवाड्याची वाट पाहावी लागेल. न्यायमूर्ती एम. बी. शहा आयोगाच्या अहवालात मेसर्स कांतिलाल कंपनीवर अश्ने डोंगरावर बेकायदेशीरपणे खनिज उत्खनन करण्याचा ठपका ठेवण्यात आला होता. मर्यादा ओलांडून उत्खनन, संबंधित खात्यांच्या परवान्याशिवाय उत्खनन, सरकारी महसूल बुडविणे अशा प्रकारचे ठपके अहवालात ठेवण्यात आले होते. या प्रकरणी खाण खात्याकडून समीर व अर्जुन यांचे पिता अनिल साळगावकर तसेच माजी मंत्री ज्योकिम आलेमाव यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदविण्यात आले होते. ज्योकिम आलेमाव हे या प्रकरणात कंत्राटदार होते. अनिल साळगावकर यांचे अलीकडेच निधन झाले. (प्रतिनिधी)