शहरं
Join us  
Trending Stories
1
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
2
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
3
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
4
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
5
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
6
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
7
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
8
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
9
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
10
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
11
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
12
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
13
“बारामतीतून उमेदवार मागे घेणे हा शेवट नाही तर आरंभ, काँग्रेस लढवय्या पक्ष”: हर्षवर्धन सपकाळ
14
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
15
बेकायदेशीर खासगी सावकारांविरुद्ध कठोर कारवाई करा; सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश
16
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
17
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
18
न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा, घरात सापडल्या होत्या जळलेल्या नोटा
19
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
Daily Top 2Weekly Top 5

सहकार भारतीची रविवार, सोमवारी राष्ट्रीय परिषद

By admin | Updated: May 11, 2017 01:42 IST

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव: सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘सहकार भारती’ या संघटनेच्या गृहनिर्माण पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची

लोकमत न्यूज नेटवर्कमडगाव: सहकारी पतसंस्थांची शिखर संस्था असलेल्या ‘सहकार भारती’ या संघटनेच्या गृहनिर्माण पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद रविवार, दि. १४ रोजी, तर मच्छीमारी पतसंस्था विभागाच्या पदाधिकाऱ्यांची राष्ट्रीय परिषद सोमवार, दि. १५ रोजी आयोजित करण्यात आल्याची माहिती सहकार भारती गोवा विभागाचे अध्यक्ष प्रकाश वेळीप यांनी दिली.या दोन्ही परिषदा मोती डोंगर मडगाव येथील शासकीय विश्रामधामात होणार आहेत. यावेळी वीजमंत्री पांडुरंग मडकईकर, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे, गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई, मार्केटिंग फेडरेशनचे अध्यक्ष उल्हास अस्नोडकर आदी उद्घाटन सत्रासाठी उपस्थित राहाणार आहेत. यात गृहनिर्माण तसेच मच्छीमारी क्षेत्रातील पतसंस्थांना गृहनिर्माण विभागाचे प्रमुख अ‍ॅड. जयंत कुलकर्णी, मच्छीमारी पतसंस्था विभागाचे प्रमुख पांडुरंग नाईक तसेच सहकार भारतीचे राष्ट्रीय सरचिटणीस विजय देवांगण हे मार्गदर्शन करणार आहेत.सहकार क्षेत्रात नव्याने सहमत झालेल्या स्थावर मालमत्ता नियमन कायदा तसेच मत्स्य उत्पादनाच्या वाढीसाठी सुरू केलेल्या नील क्रांतीच्या योजनांसंदर्भात व इतर पतसंस्थांच्या समस्यांवर चर्चा करण्यात येणार आहे. सहकार भारती ही २२ राज्यातील गृहनिर्माण, मच्छीमारी, ग्राहक संस्था, विविध कार्यकारी संस्था तसेच नागरी व ग्रामीण कर्ज पुरवठा करणाऱ्या पतसंस्थांची शिखर संस्था असून गोव्यात अशाप्रकारची ही परिषद पहिल्यांदाच आयोजित केली जात असल्याची माहिती वेळीप यांनी दिली. या वेळी या संघटनेच्या गोवा विभागाचे सरचिटणीस सतीश भट तसेच राष्ट्रीय कार्यकारी मंडळाचे सदस्य सतीश वेळीप उपस्थित होते.