शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

आरएसएसचा भाजपशी संघर्ष!

By admin | Updated: December 3, 2015 01:44 IST

पणजी : गोव्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून प्रथमच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक

पणजी : गोव्यात प्राथमिक शिक्षणाच्या माध्यमाच्या विषयावरून प्रथमच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यातील संबंधांना तडे गेले आहेत. भाजप व संघ नेत्यांच्या आतील वर्तुळात याबाबतची चर्चा सुरू असून पार्सेकर सरकार मात्र माध्यमप्रश्नी आपली भूमिका बदलण्यास मुळीच तयार नाही, अशी माहिती मिळाली. डायोसेझन संस्थेच्या ज्या १३२ इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शाळांना सरकारी अनुदान मिळते, त्यांना ते सुरूच राहील. प्रथम पर्रीकर सरकारने अनुदान सुरूच ठेवण्याचे ठरविले व आता पार्सेकर सरकारचेही धोरण तेच आहे. मुख्यमंत्री पार्सेकर यांनी यापूर्वी विधानसभेतही हे धोरण स्पष्ट केले आहे. अजून या धोरणात बदल झालेला नाही, असे दोघा मंत्र्यांनी ‘लोकमत’ला सांगितले. २०१२च्या विधानसभा निवडणुकीवेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेत्यांनीच राज्यभर शिक्षणाच्या माध्यमप्रश्नी काँग्रेस सरकारविरुद्ध आंदोलन चालविले. पर्रीकर सरकार अधिकारावर आल्यानंतर संघाने कळ सोसली होती; पण पार्सेकर सरकारही अनुदान सुरूच ठेवत असल्याने पुन्हा एकदा संघ नेत्यांनी दंड थोपटले आहेत. यापुढील टप्प्यात भारतीय भाषा सुरक्षा मंचचे आंदोलन वाढत जाणार आहे. तशी व्यूहरचना संघाने केली आहे. दरम्यान, भाजपसोबत सत्तेत असलेल्या म.गो. पक्षाने भाषा सुरक्षा मंचच्या आंदोलनास आपला पाठिंबा जाहीर केला आहे. इंग्रजी शाळांना सरकारी अनुदान नको, ही आमची पूर्वीचीच भूमिका कायम असून आमचा पाठिंबा मंचाला आहे, असे ‘मगो’चे अध्यक्ष व मंत्री दीपक ढवळीकर म्हणाले. (खास प्रतिनिधी)