शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

जंगलांमधील आगींच्या बाबतीत अहवाल पंतप्रधान कार्यालयात - मुख्यमंत्र्यांची माहिती

By किशोर कुबल | Updated: March 15, 2023 19:32 IST

पणजी- म्हादई अभयारण्यासह राज्यात अन्य भागांमध्ये वन क्षेत्रात ज्या आगिच्या घटना घडल्या त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे तसेच राष्ट्रीय आपत्ती ...

पणजी- म्हादई अभयारण्यासह राज्यात अन्य भागांमध्ये वन क्षेत्रात ज्या आगिच्या घटना घडल्या त्यासंबंधी पंतप्रधान कार्यालयाला पाठवला आहे तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापनानेही अहवाल सादर केलेला आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.गोवेकरांसाठी दिलासादायक बाब म्हणजे गेल्या दोन दिवसात आगिची नवीन घटना घडलेली नाही.

वनमंत्री विश्वजित राणे यांनी व्टीटमध्ये दिलेल्या माहितीनुसार आग विझविलेल्या ठिकाणी बारकाईने नजर ठेवली जात आहे. पुन्हा आग लागू नये याची दक्षता घेतली जात आहे. सत्तरी तालुक्यात देरोडें, सुर्ला-म्हादई आदी भागात नजर ठेवली जात आहे. हवेतील आर्द्रता वाढल्याने तसेच हलक्या सरींमुळे खोतिगांव, नेत्रावळी भागात दिलासा मिळाल्याचे राणे यांनी म्हटले आहे.

वन क्षेत्रांमध्ये आगिच्या घटना घडू नयेत यासाठी ३५० जण तैनात आहेत.गेल्या काही दिवसात लागलेल्या आगी विझविण्यासाठी स्थानिकांनी जे सहकार्य दिले त्याबद्दल वनमंत्र्यांनी आभार मानले आहेत. दरम्यान, आगिच्या काही घटनांचे कॉल्स अग्निशामक दलास काल आले त्यात पार्से,पेडणे येथे कोरड्या गवताला लागलेली आग तसेच कुडासें, वाळपई येथील आग आदी दुर्घटनांचा समावेश होता.

टॅग्स :goaगोवा