शहरं
Join us  
Trending Stories
1
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
2
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
3
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
4
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
5
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
6
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
7
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
8
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
9
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
10
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
11
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
12
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
13
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
14
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
15
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
16
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
17
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
18
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
19
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
20
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
Daily Top 2Weekly Top 5

प्रादेशिक आराखडा खुला

By admin | Updated: December 2, 2015 01:28 IST

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला.

पणजी : राज्याचा बहुचर्चित २०२१चा गोवा प्रादेशिक आराखडा अखेर मंगळवारी (दि.१) सरकारने खुला केला. लोकांच्या सूचना व आक्षेपांनुसार आराखड्यात दुरुस्त्या करायच्या असल्याने मंगळवारपासून एकूण ३० दिवसांची मुदत लोकांना सरकारने दिली आहे. सर्व तालुक्यांचे आराखडे खुले करण्यात आले आहेत. नगर नियोजन खात्याच्या तिसवाडी, पेडणे, डिचोली, फोंडा, मुरगाव, केपे व काणकोण येथील तालुका पातळीवरील कार्यालयांमध्ये तसेच म्हापसा व मडगाव येथील जिल्हास्तरावरील कार्यालयांमध्ये आराखडे पाहण्यासाठी उपलब्ध आहेत, असे मुख्य नगर नियोजक एस. टी. पुत्तुराजू यांनी जाहीर केले आहे. २०२१चा प्रादेशिक आराखडा दिगंबर कामत सरकार अधिकारावर असताना तज्ज्ञांकडून तयार करून घेण्यात आला होता. तथापि, हा आराखडा राज्याचे हित पाहणारा नाही, असा आरोप विधानसभा निवडणुकीवेळी करून भाजपने तो आराखडा रद्द करण्याची मागणी केली होती. राज्याला नवा आराखडा देण्याची ग्वाही दिली होती. तथापि, सरकारने हा आराखडा रद्द न करता त्यात सुधारणा कराव्यात, अशी नवी भूमिका घेतली. हा आराखडा सुधारणांसाठी लवकर खुला करा, अशी मागणी ‘गोवा बचाव अभियान’ गेली तीन वर्षे करत होते. शेवटी आता साडेतीन वर्षांनंतर सरकारने आराखडा खुला केला आहे. बार्देस आणि सासष्टी तालुक्याच्या आराखड्याबाबत जास्त वाद आहे. यापूर्वी आराखड्यांबाबत सुमारे साडेतीन हजार सूचना तथा तक्रारी सरकारकडे आल्या आहेत. त्यांनी नव्याने अर्ज करण्याची गरज नाही, असे नगर नियोजन खात्याने म्हटले आहे. खात्याने प्रकाशित केलेल्या यादीत ज्यांची नावे आलेली नसतील, त्यांनी त्यांची मते व सूचना पुन्हा सादर कराव्यात, असेही पुत्तुराजू यांनी म्हटले आहे. २०२१चा आराखडा पर्रीकर सरकारने ४ जून २०१२ रोजी स्थगित केला होता. राज्यातील अनेक बिल्डरांचे व राजकारण्यांचेही लक्ष आराखडा कधी खुला होतो, याकडे लागून होते. आता विविध ठिकाणी सेटलमेंट झोन, कमर्शिअल झोन अस्तित्वात आणण्याचे तसेच एफएआर वाढवून मिळण्यासाठी धडपड करण्याचे प्रयत्न बिल्डरांकडून केले जाण्याची दाट शक्यता आहे. ताळगाव व म्हापशाचे ओडीपी वादग्रस्त ठरत असतानाच सरकार आता पणजीचाही ओडीपी खुला करणार आहे. याच स्थितीत आराखडाही खुला झाल्यामुळे पर्यावरण, शेतजमिनी, जलसाठे यांच्या हितरक्षणाविषयी दक्ष असलेल्या एनजीओंची जबाबदारी वाढली आहे. (खास प्रतिनिधी)