शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारत आणि चीन रशिया-युक्रेन युद्धाला निधी देत ​​आहेत"; तेल खरेदीवरून ट्रम्प यांचा UNGA मध्ये आरोप
2
"भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे संपवली, पण कोणत्याही पंतप्रधानांनी मदत केली नाही," डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
3
Asia Cup 2025 : टॉपर श्रीलंकेचा सुपर फोरमध्ये फ्लॉप शो! पाक जिंकले तरी OUT होण्याचा धोका; ते कसं?
4
PAK vs SL War of Celebration :पाक गोलंदाजाने कळ काढली; हसरंगानं त्याचा बदला घेतला, पण... (VIDEO)
5
रशिया कसं थांबवेल युक्रेन युद्ध? ट्रम्प यांनी UNGA मध्ये सांगितला अमेरिकेचा प्लॅन; पुतिन यांचं टेन्शन वाढणार!
6
पाक गोलंदाजानं केली हसरंगाची कॉपी! मग IND vs PAK मॅचचा दाखला देत इरफाननं काढली 'लायकी' (VIDEO)
7
वैभव खेडेकरांच्या BJP प्रवेशाचा मुहूर्त मिळेना; कार्यकर्त्यांसह मुंबई गाठली पण पक्षप्रवेश नाही
8
पाकिस्तानच्या जाफर एक्सप्रेसमध्ये स्फोट; ट्रेन रुळावरून घसरुन उलटली, काही तासांपूर्वीच लष्कराला करण्यात आलं होतं लक्ष्य
9
बिग सरप्राइज! थेट टीम इंडियाची कॅप्टन्सी मिळाली अन् दिनेश कार्तिक पुन्हा मैदानात उतरण्यास झाला तयार
10
लग्नानंतर वैवाहिक संबध ठेऊ शकला नाही पती, पत्नीनं नपुंसक असल्याचा आरोप करत केली 2 कोटींची मागणी अन् मग...
11
IND vs PAK: पाकिस्तानच्या 'चिल्लर पार्टी'ला हरभजनचा इशारा, म्हणाला- थोडे मोठे व्हा नि मग...
12
"देशी गाय कोणी विकायला निघालं, तर त्याला फाशी द्या"; सदाभाऊ खोत यांची सरकारकडे मागणी, नेमकं काय म्हणाले?
13
भारताने जिंकलेल्या १९८३ वर्ल्डकप फायनलमधील पंच डिकी बर्ड यांचे ९२व्या वर्षी निधन
14
पावसाने झोडपले, शेतकरी संकटात, सरकार कर्जमाफीचा निर्णय कधी घेणार?; एकनाथ शिंदे म्हणाले...
15
“पंचनामे-सर्वे सोडा, ओला दुष्काळ जाहीर करा अन् सरसकट हेक्टरी ५० हजार रुपये द्या”: सपकाळ
16
GST कपातीनंतर आता एवढी स्वस्त झालीय ५ स्टार रेटिंग असलेली Tata Punch; जाणून घ्या, कोण कोणत्या कारला देते टक्कर?
17
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमुळे इमॅन्युएल मॅक्रॉन अडकले ट्रॅफिकमध्ये; फ्रान्सच्या प्रमुखांनी थेट लावला ट्रम्प यांनी फोन
18
"कधीतरी जबाबदारी घ्यायला शिका"; भाजपा खासदाराने ममता बॅनर्जींना सुनावले, म्हणाले- "सतत..."
19
"गर्भवती महिलांना पॅरासिटामॉल गोळीने..."; WHO ने फेटाळून लावला डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
20
फ्लिपकार्ट बिग बिलिअन डेजचा मोठा स्कॅम? अनेकांनी आयफोन १६ ऑर्डर केले, कंपनीने अचानक रद्द केले...

प्रदेशाध्यक्षपदासाठी रवींचे लॉबिंग

By admin | Updated: May 14, 2017 02:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी माजी मुख्यमंत्री व आमदार रवी नाईक यांनी जोरदार लॉबिंग सुरू केले आहे. लुईझिन फालेरो हे आता प्रदेशाध्यक्षपदी राहणार नाहीत, याची कल्पना आल्यानंतर काँग्रेसच्या काही आमदारांचा पाठिंबा मिळविणे नाईक यांनी सुरू केले आहे आणि बहुतेक आमदारांनी नाईक यांच्यासाठी अनुकूलताही दाखवली आहे.काँग्रेसच्या संघटनात्मक निवडणुका येत्या महिन्यात सुरू होत आहेत. सदस्य नोंदणी मोहीम येत्या दि. १५ मेपर्यंत संपवावी असे ठरले होते; पण पक्षश्रेष्ठींनी त्यासाठी आणखी १५ दिवसांची मुदतवाढ दिली आहे. त्यानंतर सर्व सदस्यांची नावे काँग्रेसच्या वेबसाईटवर उपलब्ध केली जाणार आहेत. नवे प्रदेशाध्यक्ष निवडून आणण्यापेक्षा ते थेट दिल्लीहून सोनिया गांधी यांनी नियुक्त करावेत, अशा प्रकारची मागणी काही आमदार करू लागले आहेत. मोन्सेरात यांच्या निवासस्थानी झालेल्या काँग्रेसच्या सर्व आमदारांच्या बैठकीस रवी नाईक हेही उपस्थित राहिले होते. ख्रिस्ती प्रदेशाध्यक्षांऐवजी बहुजन समाजातील प्रदेशाध्यक्ष असावा, असे आमदारांचे म्हणणे आहे. काही आमदारांना प्रदेशाध्यक्षपदावरील व्यक्ती ही आमदार नसावी असे वाटते.दरम्यान, चेल्लाकुमार हे तीन दिवसांची गोवा भेट आटोपून शनिवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले. सोमवारी ते काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांना भेटून आपला अहवाल सादर करणार आहेत. चेल्लाकुमार पुन्हा येत्या महिन्यात गोव्यात येऊन नवे प्रदेशाध्यक्ष कोण असावेत, याविषयी चर्चा करतील, असे सूत्रांनी सांगितले. फालेरो यांच्याभोवती काँग्रेसमधील जी मंडळी गेली दोन वर्षे फिरत होती, त्यांना बदलाची चाहूल लागली असून त्यांनी रवी नाईक यांच्याशी आपली निष्ठा दाखविणे सुरू केले आहे.