शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
2
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
3
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
4
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
5
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
6
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
7
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
8
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
9
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
10
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
11
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
12
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
13
आशा भोसलेंचे कधीच न पाहिलेले दुर्मिळ फोटो; आर.डी. बर्मन ते लता दीदींसोबतचे खास क्षण, प्रत्येक फोटोमागे भन्नाट किस्सा
14
मुंबई इंडियन्सनं 'टाईमपास' केला; Hardik Pandya ला १२ लाखांचा फटका; Tim David लाही शिक्षा
15
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
16
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
17
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
18
Rohit Sharma Injury : मुंबई इंडियन्ससाठी वाजली धोक्याची घंटा; रोहित शर्मा पुढच्या सामन्याला मुकणार?
19
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
20
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्याला पावसाची सलामी

By admin | Updated: March 2, 2015 01:21 IST

पणजी : उन्हाळा उंबरठ्यावर असताना दमदार पावसाने गोव्याला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झोडपले. रविवारी दोन इंच पावसाची नोंद झाली.

पणजी : उन्हाळा उंबरठ्यावर असताना दमदार पावसाने गोव्याला रविवारी पहाटे तीनच्या सुमारास झोडपले. रविवारी दोन इंच पावसाची नोंद झाली. अरबी समुद्रातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे भारतीय किनारपट्टीत चक्रीवादळासारखी स्थिती निर्माण होऊन पाऊस कोसळला. अरबी समुद्रात अचानक झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे गोवा, महाराष्ट्र आणि गुजरातलगतच्या भारतीय किनारपट्टी भागात शनिवारी सायंकाळी तापमानात वाढ होऊ लागली तेव्हाच पावसाचे संकेत मिळू लागले होते. समुद्रावरून पावसासह जोरदार वारा किनारपट्टीच्या दिशेने येण्याची शक्यता असल्यामुळे हवामान खात्याने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशाराही दिला होता. रविवारी पहाटे तीनपासून सहा वाजेपर्यंत पाऊस पडला. रविवारी दिवसभरही अधून मधून हलक्या सरी पडत होत्या. दुपारी तीन वाजल्यानंतरही अनेक ठिकाणी पुन्हा पाऊस पडला. भारतीय किनारपट्टीलगतच्या प्रदेशात रविवार आणि सोमवारीही पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. इन्सेट ३ डी आणि कल्पना १ उपग्रहानुसार प्राप्त छायाचित्रांत गोवा, महाराष्ट्र, गुजरात, राजस्थानसह संपूर्ण पश्चिम किनारपट्टी भागात, मध्य-उत्तर भारत तसेच इशान्येकडील भागात पावसाचे ढग जमले आहेत. ही छायाचित्रे भारतीय हवामान खात्याच्या वेबसाईटवर प्रसिद्धही केली आहेत. ऋतुचक्रानुसार १ मार्च या दिवशी उन्हाळा सुरू होतो. उन्हाळा सुरू व्हायला एक दिवस असताना हवामानात अचानक बदल झाल्याने हा पाऊस कोसळला. (प्रतिनिधी)