शहरं
Join us  
Trending Stories
1
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
2
Latest Marathi News LIVE Updates: "गेल्या एक-दीड वर्षांपासून अशा...; ठाकरेंच्या खासदारांसोबतच्या बैठकीवर एकनाथ शिंदेंचे स्पष्टीकरण
3
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
4
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
5
महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
6
रिश्ते मायने रखते हैं! सुप्रिया सुळे आता सुनेत्रा पवारांचा प्रचार करायला जाणार? म्हणाल्या...
7
Weekend Tips: स्मार्ट लोकांचे 'स्मार्ट' वीकेंड! यशस्वी लोक सुट्टीच्या दिवशीही कसे राहतात प्रोडक्टिव्ह? जाणून घ्या
8
मालेगाव स्फोटातून मुक्तता झाल्यानंतर कर्नल पुरोहित यांचे मोठे प्रमोशन; आता ब्रिगेडियर पदावर होणार पदोन्नती
9
"माझे कॉल रेकॉर्ड तपासा, हिंमत असेल तर फोटो दाखवा; अरविंद सावंतांनी लिहून दिला निष्ठेचा पुरावा
10
'अमेरिकेने मूर्खपणा करू नये, नेतान्याहूंच्या जाळ्यात अडकू नये...'; इराणचा थेट इशारा!
11
Mukul Choudhary: मुकुल चौधरीच्या शेवटच्या षटकाराची का होतेय चर्चा? मालक संजीव गोएंका बघतच राहिले!
12
बीएसएनएल पुन्हा मार्केटमध्ये परतली...! Jio आणि Airtel ला टाकलं मागे; ठरली देशातील नंबर-१ कंपनी
13
“फडणवीसांकडून शिंदेंच्या पक्षाचे ऑपरेशन सुरू, आमचे सर्व खासदार एकत्र”; संजय राऊतांचा दावा
14
डोशाच्या पिठात विष कुणी कालवले? सख्ख्या पित्यावर पोलिसांचा संशय; घरामध्ये सापडल्या सल्फासच्या गोळ्या!
15
इस्रायलचा एक इशारा अन् पाकिस्तानचे संरक्षण मंत्री घाबरले! कॅन्सरची पोस्ट डिलीट केली
16
Stress Management: तणावमुक्त जगण्यासाठी थेरपीशिवाय मन प्रसन्न ठेवण्याचे काही सोपे आणि घरगुती उपाय
17
सोने, चांदी, फ्लॅट, गाड्या... सरकारी अधिकाऱ्याकडे कोट्यवधींचं घबाड; कमाईपेक्षा संपत्ती जास्त
18
Gold-Silver च्या दरात आजही मोठी घसरण; पाहा तुमच्या शहरात किती स्वस्त झालं सोनं? पाहा नवी किंमत
19
"रणवीर सिंहने पोटात स्टेपलर...", अनुराग कश्यपने अभिनेत्याचा किस्सा; 'धुरंधर'चा सीनही विसराल
20
इस्लामाबाद ठरणार 'शांतीदूत'? इराण-अमेरिका संघर्षात पाकिस्तानची मोठी मध्यस्थी; जगभराचे लक्ष!
Daily Top 2Weekly Top 5

रेनकोट, गणवेशांचा अद्याप पत्ता नाही!

By admin | Updated: May 16, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : येत्या वीस दिवसांत नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ५४ टक्के पाठ्यपुस्तके

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : येत्या वीस दिवसांत नवे शैक्षणिक वर्ष सुरू होणार आहे. पहिली ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी ५४ टक्के पाठ्यपुस्तके आतापर्यंत शिक्षण खात्याकडून तालुका भागशिक्षणाधिकाऱ्यांकडे पोहोचली आहेत; पण रेनकोट व गणवेशांचा अजूनही पत्ता नाही.अर्धा पावसाळा संपुष्टात आल्यानंतर विद्यार्थ्यांच्या हाती रेनकोट दिले जातात हा वार्षिक अनुभव झालेला आहे, असे काही पालकांनी सांगितले. यंदा पाऊस लवकर सुरू होत आहे. जूनच्या पहिल्या आठवड्यात नवे शैक्षणिक वर्ष सुरू होईल. तोपर्यंत मुलांना रेनकोट मिळालेले असतील, असे म्हणण्यासारखी स्थिती नाही. अगदी उशिरा म्हणजे पावसाळा संपता संपता जे रेनकोट मुलांना दिले जातात, तेही योग्य दर्जाचे नसतात, असे काही पालकांचे मत आहे.विद्यार्थ्यांना गणवेश शिवून देऊ नका, तुम्ही कूपन द्या, आम्ही शिवून घेतो, असे यापूर्वी अनेकदा पालकांनी शिक्षण खात्याला व सरकारला सांगून पाहिले. मात्र, या वेळीही जुनीच पद्धत स्वीकारण्यात आली आहे. मुलांना जे गणवेश सरकारी यंत्रणेकडून पुरविले जातात, ते अघळपघळ असतात. कपड्याचा दर्जा ठिक नसतोच. शिवाय अनेक विद्यार्थ्यांना ते गणवेश योग्य स्थितीत होतच नाहीत. शाळेमध्ये येऊन संबंधित कर्मचारी शर्ट तसेच हाफपॅन्टचे माप घेऊन जातात; पण प्रत्यक्षात गणवेश देताना तो ठिक दिला जात नाही, असा अनुभव अनेकांनी सांगितला. नवे शैक्षणिक वर्ष सुरू होऊन एक-दोन महिने झाल्यानंतर मग कधीतरी गणवेश मिळेल. तोपर्यंत पालकांनीच स्वखर्चाने आपल्या मुलांना गणवेश शिवून घेतलेले असतात. खादी मंडळाकडे रेनकोट व गणवेश वितरणाचे काम सरकारने सोपवले आहे.दरम्यान, या वेळी प्रथमच पाठ्यपुस्तके मात्र वेळेत येऊ लागली आहेत. याबाबत भागशिक्षणाधिकाऱ्यांमध्येही समाधानाची भावना आहे. सांगे व काणकोण तालुक्यात सर्व विषयांची पाठ्यपुस्तके १०० टक्के पोहोचली आहेत. अन्य तालुक्यांमध्ये वितरण सुरू आहे. आतापर्यंत सरासरी ५४ टक्के पाठ्यपुस्तकांचे राज्यात वितरण झाल्याचे शिक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.