शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

सरकारवर दबावासाठी धरणे

By admin | Updated: September 7, 2014 01:07 IST

पणजी : सरकार खाण व्यवसाय नव्याने सुरू व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसत नाही. सारे काही संथ गतीने चालले आहे.

पणजी : सरकार खाण व्यवसाय नव्याने सुरू व्हावा म्हणून जोरदार प्रयत्न करताना दिसत नाही. सारे काही संथ गतीने चालले आहे. यामुळे दबाव निर्माण करत सरकारला इशारा देण्यासाठी राज्यातील खाण अवलंबितांनी येत्या मंगळवारी पणजीत लाक्षणिक धरणे आंदोलन करण्याचे ठरविले आहे. गोंयचा मायनिंग लोकांचो मंचचे निमंत्रक अ‍ॅड. सुहास नाईक व कामगार नेते राजू मंगेशकर यांनी याविषयी शनिवारी पत्रकार परिषदेत माहिती दिली. गोवा सरकारने खाण व्यवसाय निलंबित केल्याच्या घटनेस येत्या मंगळवारी दोन वर्षे पूर्ण होत आहेत. सर्वोच्च न्यायालयाने खाण बंदी उठवूनही पाच महिन्यांचा काळ लोटला, तरी राज्य सरकारने निलंबन मागे घेतलेले नाही. यामुळे खाणींवर काम करणारे सुमारे पाच हजार कर्मचारी अडचणीत आहेत. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी खाण व्यवसाय सुरू व्हावा म्हणून कष्ट घेतले; पण सध्या सरकार उत्साहाने व जोरात काही करत आहे असे दिसत नाही. सहा महिन्यांत अहवाल द्या, असे सर्वोच्च न्यायालयाने सांगितले होते; पण पाच महिने झाले, तरी सरकार पुन्हा न्यायालयाकडे गेलेले नाही, असे मंगेशकर म्हणाले. सरकारने लोकांच्या भावनांशी खेळू नये. १५ सप्टेंबरपर्यंत खाण लिज नूतनीकरण धोरण जाहीर करू, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले होते. पंधरा तारीख येण्यास अवघेच दिवस शिल्लक आहेत. आॅक्टोबरमध्ये लिज नूतनीकरण करून दिले जाईल, असेही सांगण्यात आले होते. सरकारच्या कामाची सध्याची गती जर पाहिली, तर पुढील सहा महिने खाणी सुरू होणार नाहीत. सरकारने वेग वाढवावा व निर्णायक भूमिका घ्यावी, असा इशारा देण्यासाठी येत्या मंगळवारी खाण अवलंबित सकाळी दहा वाजता कदंब बसस्थानकाजवळील क्रांती सर्कलजवळ जमून धरणे धरतील, असे मंगशेकर यांनी सांगितले. (खास प्रतिनिधी)