पणजी : घरगुती वीज ग्राहकांसाठी खात्याने किंचित दिलासा देताना आगामी आर्थिक वर्षासाठी दरकपातीचा प्रस्ताव संयुक्त वीज नियमन आयोगासमोर ठेवला आहे. २0१ ते ४00 युनिटपर्यंत प्रति युनिट ३ रुपये १0 पैसे आकारण्यात येत होते. आता २0१ ते ३00 युनिटपर्यंत प्रति युनिट २ रुपये ४0 पैसे आणि ३0१ ते ४00 युनिटपर्यंत प्रति युनिट ३ रुपये १0 पैसे आकारले जातील. राज्यातील ६७ हजार घरांना याचा लाभ होईल. मुख्य अभियंता दीपक भजेकर यांनी ही माहिती दिली. मासिक शुल्कापासूनही ग्राहकांना मुक्ती देण्याचा प्रस्ताव आहे. जेवढी वीज वापरली जाईल तेवढेच बिल दिले जाईल. लष्करी आस्थापनांसाठी प्रति युनिट ३.२0 पैशांवरून ५ रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. २0१६-१७ या आर्थिक वर्षासाठी सुधारित दरांचा प्रस्ताव खात्याने ठेवला असून संयुक्त वीज नियमन आयोगाच्या मान्यतेनंतर तो अमलात (पान २ वर)
वीज दरकपातीचा प्रस्ताव
By admin | Updated: March 10, 2016 02:00 IST