शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

प्रस्थापितांची सत्त्वपरीक्षा

By admin | Updated: March 10, 2017 02:21 IST

पणजी : उद्या शनिवारी मतमोजणी होईल व राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांचा निकाल लागेल; पण दहा ते बारा प्रस्थापित

पणजी : उद्या शनिवारी मतमोजणी होईल व राज्यातील चाळीसही विधानसभा मतदारसंघांचा निकाल लागेल; पण दहा ते बारा प्रस्थापित उमेदवारांचे नेमके काय होणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वच गोमंतकीयांना आहे. मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, लुईझिन फालेरो, मंत्री राजेंद्र आर्लेकर, दिलीप परुळेकर, दयानंद मांद्रेकर, मिलिंद नाईक, माजी मंत्री दीपक ढवळीकर, माविन गुदिन्हो, बाबूश मोन्सेरात, चर्चिल आलेमाव, आमदार सुभाष फळदेसाई, गणेश गावकर यांच्या मतदारसंघातील मतदार कोणता कौल देतात, याकडे लोकांचे विशेष लक्ष आहे.या वेळी बहुतेक मतदारसंघांमध्ये निवडणुका अटीतटीच्या ठरल्या. टपाल मतदानाचाही वाद गाजला. कोण जिंकणार व कोण हरणार याबाबतची चर्चा गेला महिनाभर रंगली. उद्या शनिवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणीला आरंभ होईल व शहरांपासून गावांपर्यंत फटाके फुटू लागतील. विजयाची होळी खेळली जाईल. मात्र, दहा ते बारा मतदारसंघांमध्ये नेमके काय घडेल, नेमका कुणाचा विजय होईल व कुणाचा पराभव होईल, हा प्रश्न लोकांच्या चर्चेमध्ये प्रामुख्याने आहे. निकालास केवळ २४ तास बाकी असल्याने उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंग राणे यांनी १९७७ सालापासून अखंडितपणे विजय प्राप्त केला आहे. ते एकही विधानसभा निवडणूक हरलेले नाहीत. तथापि, यावेळची निवडणूक चुरशीची ठरली आहे. या वेळी अकरावी निवडणूक राणे यांनी लढविलेली आहे. ती त्यांची शेवटची निवडणूक असल्याने निकालाकडे विशेष लक्ष आहे.मुख्यमंत्री पार्सेकर तसेच मंत्री आर्लेकर यांना अनुक्रमे मांद्रे व पेडणे मतदारसंघात या वेळी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. साळगाव मतदारसंघात भाजपचे उमेदवार मंत्री दिलीप परुळेकर यांना गोवा फॉरवर्डचे उमेदवार जयेश साळगावकर यांच्याशी, तर शिवोलीत मंत्री दयानंद मांद्रेकर यांना विनोद पालयेकर यांच्याशी दोन हात करावे लागले. प्रियोळ मतदारसंघात मगोपचे अध्यक्ष उमेदवार दीपक ढवळीकर व अपक्ष उमेदवार गोविंद गावडे यांच्यात जोरदार टक्कर झालेली आहे. तोच अनुभव मुरगाव मतदारसंघात भाजपचे मिलिंद नाईक व काँग्रेसचे संकल्प आमोणकर यांच्यातील लढतीबाबत आला आहे. बाणावलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार चर्चिल आलेमाव यांना, तर दाबोळीत भाजपचे उमेदवार माविन गुदिन्हो यांना निवडणूक जड गेलेली आहे. दाबोळीत मगोप विरुद्ध भाजप असा सामना झाला आहे. सांगेत भाजपचे उमेदवार सुभाष फळदेसाई (पान २ वर)