शहरं
Join us  
Trending Stories
1
सगळे बघतच राहिले, PM मोदी-राहुल गांधी एकत्र; आपुलकीने विचारपूस अन् चर्चा; नेमके काय घडले?
2
स्लीपर वंदे भारत आता मुंबईतून धावणार, रेल्वे मंत्रालयाची मंजुरी; कुठल्या मार्गावर सुरू होणार?
3
चिंताजनक! युद्धविरामानंतरही होर्मुझ मार्ग असुरक्षित; सागरी सुरुंग कुठे पेरले? इराणच विसरला
4
२००० कोटींचा महाघोटाळा! ६.३ कोटी कॅश, ७.५ कोटींचे दागिने; १९ हजार लोकांना गंडा, ED ची मोठी कारवाई
5
मंत्री झिरवाळ 'व्हिडिओ' प्रकरणाला नवं वळण; FIR रद्द करण्यासाठी आरोपीची कोर्टात धाव; आरोपांनी खळबळ
6
लग्नाची मागणी फेटाळली, रागीट युवकाने युवतीला टोचलं HIV संक्रमित इंजेक्शन, मग १ महिन्यांनी...
7
“प्रत्येक गोष्टीसाठी कोर्टाची पायरी चढू नका”; सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या २५ जनहित यचिका
8
IPL 2026: वैभव सूर्यवंशी नावाचं वादळ थांबेना! मुंबई, सीएसकेनंतर विराटच्या आरसीबीलाही दाखवला हिसका
9
अंधश्रद्धेचा बळी! मुलीच्या मृत्यूनंतर ६ महिने अंत्यसंस्कार नाहीत; बापाच्या कृत्याने पोलीस हादरले
10
Video - किती गोड! बीट, ब्रोकली, स्ट्रॉबेरी... पप्पांनी केला लाडक्या लेकीचा 'नॅचरल' मेकअप
11
"खरातमुळे दिल्लीत आमची चेष्टा होतेय, महाराष्ट्राचं हसू झालंय"; भोंदू बाबाच्या कृत्यांवर सुप्रिया सुळे संतापल्या
12
पतीच्या डोळ्यासमोरच बुडत होती पत्नी, पण...; बोट दुर्घटनेमुळे हसतं-खेळतं कुटुंब झालं उद्ध्वस्त
13
Gold Price Today: महिन्याभरात सोनं १०,१३१ रुपयांनी झालं स्वस्त; चांदी ३२,८९६ रुपयांनी घसरली; पाहा काय आहे नवी किंमत?
14
मराठवाडा हादरला! हिंगोली, परभणी आणि नांदेड जिल्ह्यांना भूकंपाचे सौम्य धक्के; नागरिकांची घराबाहेर धाव
15
कस्टम ऑफिसर बनून फिल्मी स्टाईलने १५ किलो सोन्याची लूट; दीड वर्ष रेकी, रचला भयंकर कट
16
Mathura Boat Tragedy : मथुरा दुर्घटनेआधीचा Video व्हायरल; बोट उलटण्यापूर्वी भजन-कीर्तनात तल्लीन होते भाविक
17
₹७.५ कोटींना खरेदी केलेलं अपार्टमेंट, ८.८७ कोटींना विकून कमावलं १८% प्रॉफिट; इनव्हेस्टमेंटचा 'टायगर' निघाला श्रॉफ
18
“बाकी कोणताच पर्याय नाही, केवळ चर्चा करण्यापुरते जिवंत आहात”; ट्रम्प यांची इराणला उघड धमकी
19
'त्या' १६५ चिमुकल्यांचे रक्ताळलेले दप्तर अन् शूज घेऊन इराण वाटाघाटीला; चर्चेआधीच अमेरिकेची कोंडी
20
EPFO 3.0: बँक खात्याप्रमाणे काढू शकाल PF चे पैसे, किती असेल UPI आणि ATM मधून विड्रॉल लिमिट? 
Daily Top 2Weekly Top 5

कन्नड महासंघाकडून देशपांडेंचा निषेध

By admin | Updated: April 18, 2015 02:36 IST

वास्को : कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांनी गुरुवारी पणजीत बंगळुरू येथे असलेल्या गोमंतकीय नागरिकांबाबत केलेल्या वक्तव्याचा

वास्को : कर्नाटकाचे उच्च शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांनी गुरुवारी पणजीत बंगळुरू येथे असलेल्या गोमंतकीय नागरिकांबाबत केलेल्या वक्तव्याचा अखिल गोवा कन्नड महासंघातर्फे निषेध करण्यात आला आहे़ त्यांचे हे वक्तव्य आपले राजकीय स्थान बळकट करण्यासाठी राजकीय हेतूने प्रेरित असून शांतता बिघडवणारे आहे, असे महासंघाने म्हटले आहे.अखिल गोवा कन्नड महासंघाचे अध्यक्ष सिदप्पा मेट्टी यांनी शुक्रवारी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे हा निषेध नोंदविला आहे़ गुरुवारी पणजीत देशपांडे यांनी, बंगळुरू येथे विविध आस्थापनांत सुमारे १० हजार गोमंतकीय नोकरीसाठी असून गोवा सरकारने बायणातील अवलंबितांचे पुनर्वसन न केल्यास या गोमंतकीयांना बंगळुरूतून हुसकावण्यात येईल, असा इशारा दिला होता़ शिक्षणमंत्री आऱ व्ही़ देशपांडे यांचे हे वक्तव्य गोवा आणि कर्नाटक या राज्यांमधील संबंध बिघडण्यास कारणीभूत ठरेल. कर्नाटकातील आमदार ए़ एस़ पाटील यांनी गेली चार दशके गोव्यात राहणाऱ्या कायदेशीर घरमालकांना माणुसकीच्या दृष्टिकोनातून पुनर्वसनाचा लाभ मिळवून देण्यासाठी शांततापूर्ण धरणे आंदोलनास पाठिंबा दिलेला आहे़आऱव्ही़ देशपांडे यांना जर गोव्यातील कन्नडिगांचा पुळका असेल, तर त्यांनी म्हादई कालव्याचे सुरू केलेले काम बंद करण्यासाठी प्रयत्न करावेत, तसेच कर्नाटकातील राजकीय नेत्यांनी समाजात कलह निर्माण करणारी अशा प्रकारची वक्तव्ये करण्याचे टाळावे, असे आवाहनही त्यांनी या प्रसिद्धी पत्रकात केलेले आहे़ (प्रतिनिधी)